close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गुरू चांगल वागून राधिकाच मन जिंकेल का?

गुरूच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात केड्याच्या घरापासून झाली. मावशीच्या बाजूला झोपलेल्या शनायाची तिच्या घोरण्याने झोप उडून जाते. दुसऱ्या दिवशी गुरु केविलवाण्या पद्धतीने स्वतःची कामे स्वतः करू लागतो. तेव्हा सरीता राधिकाला म्हणते की, राधिका बघ ना गुरु कसा करतोय ते त्याला बोल काहीतरी, पण राधिका म्हणते त्यांना मी ही कामे करायला सांगितले नव्हते. एवढ्यात श्री सुभेदार आणि राधिका गुरुची खिल्ली उडवतात.

काही वेळाने राधिका समिधाच्या मुलीला बघायला जाते. दरम्यान ऑफिसला निघालेल्या गुरूला बस स्टॉपवर बघून राधिका त्याच्या बाजूला आपली गाडी थांबून सोबत येताय का असे विचारते. पण गुरु देतो. तेव्हा राधिका निघून जाते आणि जाताना म्हणते फक्त ऑफिसला वेळेवर या नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतील. राधिका निघून गेल्यावर बस स्टॉपवर गुरुची फार हालत होते पण त्याला बसमध्ये चढायला काही मिळत नाही. शेवटी त्याला रिक्षा करून ऑफिसला जावे लागते. आजही ऑफिसला उशीरा पोहोचणाऱ्या गुरूला राधिका कोणत्या प्रकारे सुनावणार हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.