गायक ते दिग्दर्शकापर्यंत जोडलं गेलयं या अभिनेत्रीचं नाव, कोण आहे ही जाणून घ्या

80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री त्या काळात नेहमी कायम चर्चेत असायची

Updated: Feb 12, 2022, 04:55 PM IST
गायक ते दिग्दर्शकापर्यंत जोडलं गेलयं या अभिनेत्रीचं नाव, कोण आहे ही जाणून घ्या title=

मुंबई : 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री नेहमी कायम चर्चेत असायची.  तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील ती चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'दामिनी' आणि 'घायल' सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या मीनाक्षीचं नाव तिच्या काळातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत जोडलं गेलं आहे. यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू ते चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांच्या नावांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मीनाक्षीसोबतच्या जवळीकतेमुळे कुमार सानूने पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. 'जुर्मा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कुमार सानू आणि मीनाक्षी यांच्यात जवळिकता वाढली होती. 'जब कोई बात बिघड जाये' या चित्रपटातील एक गाणं अभिनेत्री मीनाक्षीवर चित्रित करण्यात आलं होतं आणि ते कुमार सानू यांनी गायलं होतं. असं म्हटलं जातं की मीनाक्षी आणि कुमार सानू एकमेकांबद्दल खूप गंभीर झाले होते. मात्र जेव्हा गायकाच्या पत्नीला हे समजलं तेव्हा घरात खूप गोंधळ उडाला होता.

याचा परिणाम असा झाला की, कुमार सानू यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्याचबोरबर मीनाक्षीही या संपूर्ण प्रकरणाच्या गदारोळामुळे कुमार सानू यांच्यापासून दूर गेल्या. मात्र, कुमार सानूनंतर मीनाक्षीलाही चित्रपट निर्माता राजकुमार संतोषी यांनी लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, अभिनेत्रीने त्याला स्पष्टपणे नकार दिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मीनाक्षी व्यवसायाने बँकर असलेल्या हरीश मैसूरसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूडला कायमचा अलविदा केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मीनाक्षी पती आणि मुलांसोबत अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहते.