Guess Who: 17 व्या वर्षी मिस इंडिया, मॅरिड गायकावर प्रेम; फोटोतल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Bollywood Actress Childhood Photos: बॉलिवूड अभिनेत्रींच्या लहानपणीचे फोटो (Meenakshi Sheshadri Childhood Photo) हे अनेक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या फोटोंची एकच चर्चा होताना दिसते. त्यातून सध्या अशाच एक लोकप्रिय अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो(Celebs Childhood Photos Viral) हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

Updated: Apr 2, 2023, 05:00 PM IST
Guess Who: 17 व्या वर्षी मिस इंडिया, मॅरिड गायकावर प्रेम; फोटोतल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?  title=
फोटो - मिनाक्षी शेषाद्री इन्टाग्राम

Meenakshi Sheshadri Childhood Photo: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे त्यांच्या लहानपणीचे फोटो (Bollywood Celebs Photos) हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यातून अनेकदा या सेलिब्रेटींचे फोटो ओळखता येतात तर काहींचे फोटो हे ओळखताही येत नाहीत. अशाच एका अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर (Celebs Viral Photo on Social Media) तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. या अभिनेत्री एकेकाळी 90 चे दशक गाजवले होते. वयाच्या 17 व्या वर्षी तिनं मिस इंडिया हा (Miss India) किताब जिंकला होता. गायक कुमार सानू हे विवाहबंध असताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करण्याचे धाडस तिनं केलं होतं. (Meenakshi sheshadri childhood photo goes viral on social media who became miss india at the age of 7)

त्यामुळे ही अभिनेत्री तेव्हा खूप चर्चत आली होती. असं म्हटलं जातं की कुमार सानू (Kumar Sanu) यांच्या प्रेमात पडल्यानंतर कुमार सानू यांचे घर उद्धवस्त झाले होते. यामुळे आता तुम्हालाही उत्सुकता लागून राहिली असेल की ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? 

वयाच्या 17 व्या वर्षी जिंकला मिस इंडिया किताब :

कदाचित एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतो आहोत. जर तुम्ही गेस केल असेल तर तुम्ही बरोबर आहात. हो, या अभिनेत्रीचे नावं आहे मिनाक्षी शेषाद्री (Meenakashi Sheshadri). तामिळ आणि हिंदी चित्रपटांमधून काम केल्यानंतर अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी बॉलिवूडच्या करिअरमधून ब्रेक घेतला असला तरी त्यांची आजही ओळख कायम आहे, ती म्हणजे उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना. मिनाक्षी शेषाद्री (Meenakashi Sheshadri Miss India at the age of 17) यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासूनच आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. 

दामिनी चित्रपटाचे यश : 

1993 साली आलेल्या 'दामिनी' (Damini Movie) या हिंदी चित्रपटानंतर मिनाक्षी शेषाद्री हे नावं घराघरात लोकप्रिय झाले. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीनं पाहतात. यावर्षीच्या 30 एप्रिलला या चित्रपटाला 30 वर्षे पुर्ण होतील. या चित्रपटातील मिनाक्षी शेषाद्रीच्या भुमिकेनं महिलावर्गांला डोळे भरून रडवले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कुमार सानूवर जडलं प्रेम : 

लोकप्रिय गायक कुमार सानू (Kumar Sanu Love Affair) यांच्यावरही त्यांचे प्रेम बसले होते त्यांच्या प्रेमाची घडी विस्कटली परंतु त्यामुळे कुमार सानू यांचे घरही उद्धवस्त झाले असे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. 

80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमध्ये यश मिळवले होते. आपल्या करिअरच्या सुरूवातीला मिनाक्षी यांनी फिल्म पेंटर बाबू यांच्याकडून अभिनयाची सुरूवात केली होती. त्यानंतर मिनाक्षीनं अनेक मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत (Meenakshi Sheshadri on Instagram) काम केले. अमिताभ बच्चन, सनी देओल, मिथून चक्रवर्ती,अनिल कपूर, गोविंदा, जॅकी श्रॉफ यांसारख्य कलाकारांसोबत कामं केली आहेत. मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म हा 16 नोव्हेंबर 1963 साली झाला. त्यांचे मुळ नावं हे शशिकला शेषाद्री असंही आहे. 'मेरी जंग', 'घायल', 'दामिनी' हे त्यांचे काही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहेत.