'या' अभिनेत्रीने पडद्यावर सख्ख्या भावासोबत केला रोमान्स

एकेकाळी गेली होती सर्व स्मृती 

Updated: May 3, 2021, 10:56 AM IST
'या' अभिनेत्रीने पडद्यावर सख्ख्या भावासोबत केला रोमान्स title=

मुंबई : हिंदी सिनेमातील एक असा विनोदी कलाकार जो हिरापेक्षा अधिक मानधन घेत असे. त्यांचं नाव होतं महमूद. महमूद यांचं संपूर्ण कुटूंब सिनेमाशी संबंधित होतं. महमूद यांच्याप्रमाणेच त्यांची बहिण देखील हिंदी सिनेमात लोकप्रिय अभिनेत्री होती. मीनू मुमताच 26 एप्रिल 1942 मध्ये यांचा जन्म झाला.

मीनू यांना लहानपणापासूनच कलेत रुची होती. याकरता त्यांनी डान्सची ट्रेनिंग देखील घेतली. हिंदी सिनेमात मीनू मुमताज यांना पहिला ब्रेक हा देविका रानी यांनी दिला होता. त्यांनी मीनू मुमताज यांना बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून ठेवलं होतं. 

1955 साली प्रदर्शित झालेला सिनेमा 'घर घर में दिवाली'मधून मीनू यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. या सिनेमात त्यांनी गावात राहणाऱ्या एका डान्सरची भूमिका साकारली होती. मात्र मीनू यांना 'सखी हातिम' या सिनेमातून ओळख मिळाली. यामध्ये त्यांनी जलपरीची भूमिका साकारली होती. 

1958 साली प्रदर्शित झालेल्या 'हावडा ब्रीज' मध्ये मीनू मुमताज यांनी आपल्या सख्या भावासोबत म्हणजे विनोदी कलाकार महमूद यांच्यासोबत रोमान्स करायला लागला होता. त्याकाळी सख्या बहिण-भावाचा रोमान्स बघून अनेक जण गोंधळले होते. मात्र या सिनेमातील मीनू मुमताज यांची जोडी कॉमेडियन जॉनी वॉकरसोबत खूप पसंत करण्यात आली. यानंतर या दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. मीनू यांनी कॉमेडी प्रमाणेच अनेक साइड रोल केले आहे. मीनू मुमताज यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1963 मध्ये दिग्दर्शक सैयद अली अकबर यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं. 

मुमताज यांना मीनू हे नाव त्यांची वहिनी मीना कुमारी यांनी दिलं होतं. एक दिवस अचानक मीनू यांच्या नजरेसमोर अंधारी आली आणि त्यांची स्मृतीच नष्ट झाली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांपासून त्यांच्या डोक्यात ट्यूमर होता. त्यांच ऑपरेशन देखील झालं होतं. त्यांचा जीव वाचला. सध्या त्या कॅनडामध्ये आहे.