कुली नंबर १ सिनेमाचा रिमेक सोशल मीडियावर ट्रोल

अभिनेता गोविंदा स्टारर १९९५ साली गाजलेला ‘कुली नंबर 1’ या सिनेमाचा रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या

Updated: Dec 29, 2020, 11:09 PM IST
कुली नंबर १ सिनेमाचा रिमेक सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : अभिनेता गोविंदा स्टारर १९९५ साली गाजलेला ‘कुली नंबर 1’ या सिनेमाचा रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वरुण धवन आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रोल होतोय. 

आता तर आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरही तो सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. या सिनेमाला १० पैकी केवळ १.३ रेटिंग मिळालंय. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनीच ‘कुली नंबर 1’च्या रिमेकचंही दिग्दर्शन केलंय.

ख्रिसमसचं निमित्त साधत हा सिनेमा खास प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची खिल्ली उडवलीये. तर सोशल मीडियावरदेखील या सिनेमातील काही सीनवर मीम्स तयार करण्यात आलेत. यापूर्वी ‘सडक 2’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. या सिनेमाला आयएमडीबी (IMDb) वर सर्वात कमी म्हणजेच १.१ इतकं रेटिंग मिळालं होतं.