Met Gala 2023: 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर 'या' सुपरमॉडेलच्या साडीनं आलियालाही टाकलं मागे

Noami Campbell in Saree at Met Gala 2023: 'मेट गाला' हा जगातील सर्वात मोठा सोहळा नुकताच न्यूयॉर्क शहरात पार पाडला. यावेळी जगभरातील अनेक नामवंत पाहूणे (Noami Campbell at Met Gala 2023) या सोहळ्याला उपस्थित होते. येथे आलेल्या सेलिब्रेटींनी नानातऱ्हेचे आऊटफिट्स परिधान (Met Gala Celebs Looks) केले होते. परंतु यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधले ते सुपरमॉडेल नॉओमी कॅपबेल हिच्याकडे. यावेळी तिनं साडी परिधान केली होती.  

गायत्री हसबनीस | Updated: May 3, 2023, 10:55 AM IST
Met Gala 2023: 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर 'या' सुपरमॉडेलच्या साडीनं आलियालाही टाकलं मागे title=
Met Gala 2023 supermodel naomi campbell wears salmon pink satin saree inspired gown at met gala

Supermodel Noami Campbell Wears Saree at Met Gala 2023: मेट गाला हा जगप्रसिद्ध सोहळा नुकताच न्यूयॉर्क येथे संपन्न झाला. या सोहळ्याला जगातील अनेक नामवंत सेलिब्रेटींनी (Noami Campbell at Met Gala Look) हजेरी लावली होती. भारतीय सेलिब्रेटींचीही अदाकारी यावेळी पाहायला मिळाली. सध्याच चित्र हे झपाट्यानं बदलत आहे. भारतीयांनी जशी पाश्चात्त्य संस्कृती आत्मसाद केली आहे त्याप्रकारे आता जगातील अनेक विविध देशांना आपल्या भारतीय संस्कृतीचीही भुरळ पडली आहे.

आजच्या जगात विविध संस्कृतीची देवाणघेवाण होताना आपण पाहतो आहोत. जागतिकीकरणानंतर अशाप्रकारे संस्कृतीची देवाणघेवाण व्हायला सुरूवात झाली होती. आता मात्र सोशल मीडियामुळे हे परंपरा रूजली आहे. तेव्हा मोठमोठ्या नामवंत मंचावरूनही ही देवाणघेवाण होताना सहज दिसतेय. (Met Gala 2023 supermodel naomi campbell wears salmon pink satin saree inspired gown at met gala)

'मेट गाला 2023' मध्ये आलेल्या सुपरमॉडेल निओमी कॅपबेल (Supermodel at Met Gala in Saree) हिनं साडीपासून प्रेरित गुलाबी रंगाचा गाऊन (Baby Pink Black Saree Gown) परिधान केला होता. त्यामुळे यावेळी उपस्थितांचे लक्ष हे तिच्याकडे वळले होते. यावेळी पांढऱ्या शुभ्र गाऊनमध्ये आलेल्या आलियालाही तिनं मागे टाकलं. मेट गालाची यावेळीची थीम होती, 'कार्ल लेगरफेल्ड - अ लाईन ऑफ ब्यूटी'. 'कार्ल लेगरफेल्ड' हे सुप्रसिद्ध जागतिक स्तरावरचे फॅशन डिझायनर होते. यांच्या एका शोसाठीही निओमी कॅपबेल हिनं रॅम्पवॉक केला असून ती त्यांची शो स्टॉपर होती.

आलियालाही टक्कर 

यावेळी तिची मेट्रोपोलिटीयन म्युझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क येथे झालेल्या 'मेट गाला'ला सोळावी उपस्थिती होती. 52 वर्षीय सुपरमॉडेलचा जलवा पाहून यावेळी भल्या भल्याच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. त्यातून आलिया भट्टलाही तिनं टक्कर देत या आऊटफिटमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले. एवढ्या मोठ्या सुपरमॉडेललाही चक्क 'मेट गाला'मध्ये येताना साडीचा मोह आवरला नाही हे पाहूनही अनेकांना आश्चर्यही वाटले. 

हेही वाचा - VIDEO: अतिउच्चभ्रू 'मेट गाला'मध्ये शिरलं झुरळं, पापराझींनी घेरलं अन् पुढे... पाहा व्हिडीओ

Met Gala मध्ये जगप्रसिद्ध मॉडेलनं साडी परिधान केली कारण... 

निओमी कॅपबेल हिनं आत्तापर्यंत अनेक महागडे आणि वेगवेगळ्या हटके स्टाईल्सचे पाश्चात्त्य कपडे परिधान केले होते. मेट गालामध्येही आगळ्यावेगळ्या आणि 'आऊट ऑफ द बॉक्स' कपड्यांची शैली आजमावली जाते परंतु पारंपारिक साडीचा लुक (Traditional Saree Look) तिनं परिधान केला होता. यामागेही एक खास कारण होतं. तिच्या एका जवळच्या भारतीय सहकार्याला श्रद्धाजंली वाहण्यासाठी तिनं यावेळी साडी परिधान केली होती. तिची साडी ही 'शनेल' (Chanel) या ब्रॅण्डच्या 2010 च्या समर कलेक्शनमधील होती. यावेळी तिनं सॅलमन पिंक कलरच्या (Salmon Pink Saree Inspired Gown) साडीपासून प्रेरित गाऊन परिधान केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचसोबत तिनं हा गाऊनचा लुक साडी चोळी प्रमाणे केला होता. मेटॅलिक पॅटर्नचा सिल्व्हर एमब्रोयडरी (Metalic Sliver Blouse) असलेला तिचा ब्लाऊज होता. तिचे हात हे सिल्व्हर कफ्सनं (Sliver Cuffs) भरले होता. त्यावर मॅचिंग कानातले तिनं परिधान केले होते. हलका मेकअप आणि केस मोकळे सोडले होते. अनेकांना तिचा हा लुकही पसंतीस पडला आहे.