Salman Khan ने मध्य रात्री Instagram वर कोणत्या महिलेला वाहिली श्रद्धांजली? सोशल मीडियावर एकच चर्चा

Salman Khan : बॉलिवूड दंबग सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर (Social media posts)  एका महिलेला श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 4, 2023, 06:05 PM IST
Salman Khan ने मध्य रात्री Instagram वर कोणत्या महिलेला वाहिली श्रद्धांजली? सोशल मीडियावर एकच चर्चा  title=
salman khan instagram post Rest in peace my Addu condolence viral on Social media netizens asked who is she

Salman Khan Instagram Post : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. नुकतचं भाईजनाला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटतं. या त्याचा वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले होते. त्यापूर्वी सल्लूमियावर सेलिब्रिटींचं करिअर संपवण्याचा आरोपावर त्याने स्पष्टीकरण दिलं होतं. 

आता पुन्हा एकदा सलमान खान चर्चेत आला आहे. त्याची सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होते आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने एका महिलेला श्रद्धाजंली वाहिली आहे. त्यानंतर कोण आहे ती महिला हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (salman khan instagram post Rest in peace my Addu condolence viral on Social media netizens asked who is she )

सलमानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन 

सलमान खानने रात्री उशिरा त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंटवर एका महिलेला श्रद्धांजली वाहिली.

त्या महिलेचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, ''माझ्या प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कायम ऋणी आहे. Rest in peace my Addu.''

ही महिला कोण?

सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर सर्वसामान्यांना आणि चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, ही महिला नेमकी आहेत तरी कोण? सलमान खानला सोशल मीडियावर फ्लोलो करणारे यूजर्स या महिला सलमानची केअर टेकर असल्याचा दावा करत आहेत. तर काही जण आया असल्याचं म्हणत आहेत. सलमान खानने काही लिहिलं नसल्याने ती कोण याबद्दल काही ठोस सांगता येणार नाही.

salmankhan

सलमान खानला जीवे मारण्याची धमक्या

गेल्या काही महिन्यांमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळीकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी येतं आहे. तर अभिनेत्याने माफी मागितली नाही तर त्याला लवकरच ठार करु असे फोन, मेसेज आणि इमेल येतं आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढण्यात आली आहे. याशिवाय बुलेट प्रुफ गाडीची सोय करण्यात आली आहे. 

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ईदच्या दिवशी रिलीज झालेला 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता सलमान खान लवकरच 'टायगर 3' मधून चाहत्यांचा भेटीला येणार आहे.