नॅशनल टीव्हीवर मीका सिंगकडून सिंगरला लग्नासाठी प्रपोज, सिंगरकडून लगेच मिळाले उत्तर

 तो त्याच्या फॅन्सलाही बऱ्याचदा विचार करण्यास भाग पाडतो. तर कधी शॅाकिंग बातम्या देत असतो. 

Updated: Apr 11, 2021, 10:00 PM IST
नॅशनल टीव्हीवर मीका सिंगकडून सिंगरला लग्नासाठी प्रपोज, सिंगरकडून लगेच मिळाले उत्तर

मुंबई : मीका सिंगची गाणी केवळ लोकांना वेडलावून त्यांना नाचण्यास भाग पाडतात. तसेच त्याच्या अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो त्याच्या फॅन्सलाही बऱ्याचदा विचार करण्यास भाग पाडतो. तर कधी शॅाकिंग बातम्या देत असतो. यावेळी मीका सिंगचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हीडिओमध्ये मीकाने लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. हे त्याने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर केले आहे, ज्यामुळे मीकाच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

मीकाकडून लग्नाचा प्रस्ताव

व्हायरल व्हीडिओ रिअॅलिटी शो इंडियन प्रो म्युझिक लीगचा आहे, जिथे मीका स्टेजवर गाणं गात आहे. स्टेजवर 'मुझ से शादी करोगी?' हे बॅालीवूडमधील  गाणं गात असताना मीकाने असे काही केले जे पाहूण प्रत्येकजण ते पाहात राहिला.

गाणं गात असताना मीका भूमी त्रिवेदीला स्टेजवर घेऊन येतो आणि मग गाण्यातून सारखे विचारतो 'मुझ से शादी करोगी?'

हे पाहून सर्व जज आणि स्पर्धक आश्चर्यचकित झाले. भूमीलाही धक्का बसला पण मीका गुडघ्यावर बसून प्रपोज करत राहिला. त्यानंतर मीकालाही त्याच्या प्रस्तावाला त्वरित उत्तर मिळाले.

भूमीने काय उत्तर दिले?

मीकाच्या प्रस्तावावर भूमी म्हणाली - "मी तर इथे तुमच्यासाठी  एक वधू शोधण्यासाठी आली आहे. हा तर इतरांवर अन्याय होईल." आता जरी मीकाचा हा प्रस्ताव आणि त्यावरचे भूमीचे उत्तर दोन्हीही विनोदी वाटत असले तरी मीकाचे आयुष्य जसे आहे, ते पाहाता केव्हा मोठा ट्विस्ट येईल हे काही सांगता येत नाही. याआधीही मीकाचे असे अनेक सीक्रेट रिलेशनशिप होते, त्यांची बरीच चर्चा झाली, पण काही समोर आले नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

मीकाचा पब्लिसिटी स्टंट?

यापूर्वी एका व्हायरल फोटोमुळे असे म्हटले जात होते की, मीका सिंग टीव्ही अभिनेत्री आकांशा पुरीसोबत लग्न करू शकतो. पण ही बातमी खोटी ठरली आणि अभिनेत्रीनेही पुढे येऊन यावर स्पष्टीकरण दिले. आता भूमी त्रिवेदी सोबत मीकाचे कासे संबंध राहातील, हे प्रत्येकजण पाहाण्यास उत्सुक असेल. तो व्हीडिओ फक्त पब्लिसिटी स्टंट आहे? की, गोष्ट पुढे गेल्यास हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.