मॉडेल मिलिंद सोमनच्या वयावरुन गोंधळ, एक वर्षाआधी जन्माला आल्याचा दावा?

मिलिंद सोमणची जन्मतारिख नक्की काय?

Updated: Jul 29, 2021, 07:31 PM IST
मॉडेल मिलिंद सोमनच्या वयावरुन गोंधळ, एक वर्षाआधी जन्माला आल्याचा दावा?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आपल्या फिट अंदाजामुळे चांगलाच चर्चेत असतो. त्याचा फिटनेसची नेहमीच हवा पाहायला मिळते. पण आता एका गोष्टीमुळे मिलिंद सोमन खूपच चिडला आहे.सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मिलिंद सोमणने विकिपीडिया पेजवर बर्‍याच चुका पाहिल्या आहेत, त्यानंतर त्यांनी आपल्या शैलीमध्ये विकिपीडियाला फटकारले आहे. 

विकिपीडिया पेजवर मिलिंद सोमण यांच्या नावाने दोन वेगवेगळ्या जन्मतारिख दाखवण्यात आल्यात आहेत. मजेशीर बाब म्हणजे त्यात एक तारीख हे मागच्या वर्षातील आहे.

मिलिंद सोमणची खरी जन्मतारिख 

विकिपीडीयाची चूक मिलिंद सोमण रिवील करत एक ट्विट शेअर केलं आहे. स्क्रीन शॉर्ट शेअर करत आपली चुकीची जन्मतारिख दाखवल्याचं म्हटलं आहे, सोबतच "कोणी विकिपीडिया हॅक केले आहे?" असा सवाल देखील केला आहे.

 या पोस्टमध्ये मिलिंदचे दोन वाढदिवस दाखवण्यात आले आहेत, एक 4 नोव्हेंबर 2020 आणि दुसरा 28 जुलै 2020 रोजी दाखवण्यात आला आहे.