... यामुळे मला आता कुणीच काम देत नाही - मिलिंद सोमण

असं का म्हणाला मिलिंद 

... यामुळे मला आता कुणीच काम देत नाही - मिलिंद सोमण  title=

मुंबई : सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने काही दिवसांपूर्वी आपल्यापेक्षा 25 वर्षाने लहान असलेली गर्लफ्रेंड अंकिता कुंवरसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर हे दोघं हनीमूनसाठी गेले. आता अशी चर्चा आहे की मिलिंद आणि अंकिता बिग बॉस सिझन 12 साठी विचारण्यात आलं होतं. मात्र 

आता मिलिंद सोमणने मोठं खुलासा केला आहे की, बिग बॉसकडून त्यांना कोणतीही ऑफर आलेली नाही. मिलिंद सोमण सध्या कोणत्याच सिनेमांत किंवा इतर कोणतंही काम करताना दिसत नाही. आताच एका दिलेल्या मुलाखतीत मिलिंद सोमणकडे काहीच काम नाही. मिलिंद म्हणाला की, फिल्म मेकर्स आता मला कोणत्याच सिनेमांत काम करत नाही. मला माहित नाही या मागचं काय कारण आहे? याचं कारण बहुदा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये माझं कोणतंच नेटवर्क नाही.

एक वेळ अशी होती की, मला खूप काम होतं आणि मी काम देखील केलं. मला अॅक्टिंग करण आवडतं. या कामांत पैसे पण चांगले मिळतात. काही लोकांनी तर सांगितलं की, मी काम चांगल करतो. पण बॉलिवूडमध्ये माझे कुणी मित्र नाहीत तसेच माझं कुठे नेटवर्क ही नाही. प्रत्येक बिझनेसमध्ये नेटवर्क असणं महत्वाचं असतं.  मिलिंद पुढे असं देखील म्हणाला की, आता तो जास्त सिनेमे पण पाहत नाही. मिलिंद सोमणला सिनेमे करायला आवडतात पण सिनेमे पाहायलाच आवडत नाही. मिलिंद एका वर्षात फक्त 3 सिनेमे पाहतो. मिलिंदने शेवटचा संजय लीला भन्साळीचा 'बाजीराव मस्तानी' पाहिली आहे.