मिल्खा सिंग यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याची भावूक पोस्ट; 'तुम्ही कायमचं...'

मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाचं नाही तर बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Jun 19, 2021, 10:35 AM IST
मिल्खा सिंग यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याची भावूक पोस्ट; 'तुम्ही कायमचं...'

मुंबई :  'फ्लाइंग सिख' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाचं नाही तर बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. मिल्खा सिंग यांचं व्यक्तीमत्व रूपरी पडद्यावर आणणारा अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar)ने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. फरहानने मिल्खा सिंह यांना श्रध्दांजली वाहात एक भावूक पोस्च लिहिली आहे. 

फरहान ट्विट करत म्हणाला, 'प्रिय  मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत  हे स्विकारण्यासाठी माझं मन तयार नाही. तुमच्याकडून मला मिळालेली ही ती एक जिद्द न सोडण्याची बाजू म्हणता येईल. कधीही हार न मानण्याची बाजू… तुम्ही आमच्यात जिवंत आहात हे सत्य आहे. कारण तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फरहान पुढे म्हणाला; 'तुमची मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही यशाचं शिखर गाठलं. तुमचा आमच्या सर्वांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव आहे. खासकरून ज्यांच्या आयुष्यात  तुम्ही एक मित्र आणि वडील म्हणून राहिलात, तो सहवास म्हणजे जणू आशिर्वाद. तुमची कथा कायम अनेकांना प्रेरणा देईल. तुम्हाला  मनापासून प्रेम... ' अशी भावूक पोस्ट करत फरहानने त्याच्य भावना व्यक्त केल्या. 

फरहान शिवाय अभिनेता शाहरुख खान, अनुपम खेर, सुनील शेट्टी, अक्षय कुमार अभिनेत्री प्रियंका चोप्रा, निम्रत कौर आणि इतर बॉलिवूडकरांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून 'फ्लाइंग सिख' यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला.