"निर्माते माझ्याकडे काहीही मागणी करायचे", मिनी माथुरचे धक्कादायक खुलासे; म्हणाली "एकदा तर मला म्हणाले Moment..."

Mini Mathur Shocking Revelations: मिनी माथूरने (Mini Mathur) आपण 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) कार्यक्रम सोडण्याचं कारण सांगत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एकदा तर निर्मात्यांनी मला क्षण निर्माण करा असं सांगितल्याची आठवण तिने सांगितली.     

शिवराज यादव | Updated: Apr 8, 2023, 07:48 PM IST
"निर्माते माझ्याकडे काहीही मागणी करायचे", मिनी माथुरचे धक्कादायक खुलासे; म्हणाली "एकदा तर मला म्हणाले Moment..." title=

Mini Mathur Shocking Revelations: छोट्या पडद्यावर मिनी माथूर (Mini Mathur) हे नाव चांगलंच प्रसिद्ध आहे. व्हिडीओ जॉकीपासून ते इंडियन आयडॉलचं सूत्रसंचालन करण्यापर्यंत आपल्या अभियनामुळे ती प्रसिद्ध झाली होती. मिनी माथूरने 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) या रिअॅलिटी शोच्या सहा पर्वांचं सूत्रसंचालन केलं होतं. पण जेव्हा कार्यक्रमाची रुपरेषा वेगळ्या मार्गाने जात असल्याचं लक्षात आलं तेव्हा मात्र तिने कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. 

मिनी माथूर 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वापासून सूत्रसंचालन करत असून सहाव्या पर्वापर्यंत सोबत होती. पण जेव्हा आता हा रिअॅलिटी शो आपला मार्ग बदलत असून, आपली ओळख पुसत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा रिअॅलिटी शो स्पर्धकांच्या ताकदीवर चालत होता. पण नंतर निर्माते खोटे क्षण निर्माण करण्याची मागणी करु लागले असा खुलासा मिनी माथुरने केला. 

मिनी माथुर नुकतीच सायरस ब्रोचा याच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. मी 'इंडियन आयडॉल'मध्ये सहभाही होणाऱ्या स्पर्धकांशी भावनिकरित्याही जोडलेले होते. मी त्यांना माझ्या घरी जेवणासाठीही बोलवायचे. त्यामुळे जेव्हा कार्यक्रमाची खरी ओळख बदलू लागली तेव्हा मला अपमान झाल्यासारखं वाटलं अशी खंत मिनी माथुरने व्यक्त केली. 

"मी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतवणूक केली होती. कॅमेरा बंद झाल्यानंतरही माझ्या चेहऱ्यावर हास्य असायचं. ते माझ्या घऱी जेवायला यायचे. मी तासनतास त्यांच्याशी गप्पा मारायचे," असं मिनी माथुरने सांगितलं आहे.

पुढे तिने सांगितलं की "आता कार्यक्रमात रिअॅलिटी राहिलेली नाही हे लक्षात आल्यानंतर मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी सहा सीझन त्यांच्यासोबत होते. यानंतर फक्त पैसे कसे कमवायचे हाच विषय होता. पण त्यादरम्यान माझा नवरा चांगले पैसे कमवायला लागला होता. पण जेव्हा रिअॅलिटी निर्माण करणं सुरु झालं तेव्हा मला ते आवडलं नाही". 

मिनी माथुरने यावेळी निर्माते आपल्याकडे वेगवेगळ्या मागण्या करायचे सांगत एक किस्सा सांगितला. एकदा त्यांनी एका स्पर्धकाला नातेवाईकाला पाहून आश्चर्यचकित हो असं सांगितलं होतं. पण त्या स्पर्धकाला आपले नातेवाईक येणार असल्याचं आधीपासून माहिती होतं असं तिने सांगितलं. 

"एकदा निर्माते माझ्याकडे आले आणि म्हणाले की, धरमजी आणि हेमा मालिनी येणार आहेत. त्यांच्यात एक क्षण निर्माण करायचा आहे. मी त्यांना हा काय प्रकार असतो अशी विचारणा केली. तुम्ही माझ्यावर सोडून द्या. मी माझ्या अनुभवाने असं काही करेन की त्यांना आश्चर्य वाटेल असं उत्तर दिलं. मी हे असं काही करणार नव्हता. हे फक्त इंडियन आयडॉल संदर्भात नाही. मी त्यानंतर अनेक असे शो केले. तिथेही असेच प्रकार चालायचे," असाही खुलासा मिनी माथुरने केला. 

मिनी माथुरला एमटीव्ही व्हिजे म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने झलक दिखला जा, इस जंगल से मुझे बचाओ असे अनेक शो केल. प्राइमच्या Mind the Malhotras या सीरिजमध्ये ती दिसणार आहे.