सिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...'

Mitali Mayekar Siddharth Chandekar : मिताली मयेकरनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केला सिद्धार्थसोबतचा लिपलॉक व्हिडीओ

दिक्षा पाटील | Updated: Jan 25, 2024, 04:33 PM IST
सिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...' title=
(Photo Credit : Social Media)

Mitali Mayekar Siddharth Chandekar : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर हे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2021 मध्ये ते लग्न बंधनात अडकले. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांना अनेकांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे मितालीच्या पोस्टनं वेधलं आहे. 

मितालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिताली आणि सिद्धार्थ हे जंगली सफारीला गेल्याचे कळते. तिथे ते त्यांच्या 'मी टाईम'चा आनंद घेत असताना सोशल मीडियावर तिनं त्यांचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिताली आणि सिद्धार्थ लिपलॉक करताना दिसत आहेत. तर हा व्हिडीओ शेअर करत मितालीनं कॅप्शन दिलं आहे की 'शांतता ही एक प्रेमाची भाषा आहे. ज्यांना ती जाणवते त्यांनाच ते कळतं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण भाग्यवान असलेल्या त्या जोडप्यांपैकी एक आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपण 7 वर्षांआधी आजच्या या दिवसासाठीच भेटलो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह! मी आहे कारण तू आहेस. जसंजसं आपलं वय होत जाईल, तसतसं हे जंगल आपल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी कायम आपल्यासोबत राहो'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मितालीच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मिताली आणि सिद्धार्थ हे मध्य प्रदेशमध्ये असलेल्या सतपुडा नॅशनल पार्कला गेले होते. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ मितालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केले आहेत. 

हेही वाचा : Fighter Twitter Review : हृतिक आणि दीपिकाचा पहिला चित्रपट पाहायचा की नाही; पब्लिक रिव्ह्यू एकदा वाचाच

सिद्धार्थच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा झिम्मा 2 हा चित्रपट एकामागे एक रेकॉर्ड करताना दिसला. तर त्याशिवाय तो नाना पाटेकर यांच्यासोबत ओले आले या चित्रपटात देखील दिसला. या चित्रपटात बाप-मुलाच्या नात्यातील गोडवा दाखवण्यात आला आहे. आता लवकरच सिद्धार्थचा श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मितालीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लाडाची लेक मालिकेत दिसली होती.