मुंबई : कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) काही दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. लवकरचं ती चाहत्यांनी गुडन्यूज देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नेंसीमध्ये देखील तिने ब्रेक घेतलेला नाही. नुकताचं भारती पती हर्ष लिंबाचियासोबत (Haarsh Limbachiyaa) 'हुनरबाज' शोमध्ये दिसली. यादरम्यान शोचे जज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीसमोर पती हर्षची अशा प्रकारे खिल्ली उडवली की सगळे पोट धरून हासू लागले.
कलर्स वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मिथुन दादा ज्याप्रकारे भारतीच्या प्रेग्नेंसीची खिल्ली उडवत आहेत. ते पाहून प्रत्येकाला हासू येईल.
व्हिडीओमध्ये भारती म्हणते, 'दादा तुम्ही हर्षला म्हणाला होता, लग्नाला 4 वर्ष झाली, तू तुझं 'हुनर' दाखवलं नाही. दादा पाहा त्याने माझ्यावर 'हुनर' दाखवलं... ' भारतीचे हे विनोदबोल ऐकून सर्वांना हासू येते.
एवढंच नाही तर भारती व्हिडीओच्या शेवटी म्हणते, 'दादा यापुढे कोणाला बोलू नका 'हुनर' दाखवा....' भारतीच्या या शब्दांनी मिथुन यांचा हशा पिकला.
सांगायचं झालं तर, कलर्स टीव्हीवरील 'हुनरबाज' शो 22 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. या शोमध्ये देशभरातील स्पर्धक आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहेत. सध्या या शोची सर्वत्र चर्चा आहे.