'मोदी काका का गांव' रिलीजच्या आधीच बनलाय मस्करीचा विषय

 रिलीज होण्याआधी 'मोदी काका का गाव' सोशल मीडियावर मस्करीचा विषय बनला आहे. 

Updated: Dec 28, 2017, 03:24 PM IST
  'मोदी काका का गांव' रिलीजच्या आधीच बनलाय मस्करीचा विषय  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरीत असलेला सिनेमा 'मोदी काका का गांव' शुक्रवारपासून सिनेमाघरात रिलीज होणार आहे.

हा सिनेमा साधारण ११ महिन्यांनंतर सिनेमागृहात येत आहे. काही कारणांमूळे या सिनेमाला सेंसॉर प्रमाणपत्र मिळाले नव्हते. पण आता याच्या रिलीजला अनुमती देण्यात आली आहे. 

सोशल मीडियावर खिल्ली 

पण रिलीज होण्याआधी 'मोदी काका का गाव' सोशल मीडियावर मस्करीचा विषय बनला आहे. ट्विटर आणि फेसबुकवर युजर्स या सिनेमाची खिल्ली उडवत आहेत. 

विकास महांते मुख्य भूमिकेत

 या सिनेमाचे नाव 'मोदी का गावं' असे ठेवण्यात आले होते. या सिनेमात विकास महांते हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा चेहरा मोदींच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. 
  
 मुंबईत राहणाऱ्या महांतेंना निवडणुकींच्या सभांमध्ये बघण्यास गर्दी जमत असे. ते अनेक टी.व्ही. शोमध्ये देखील दिसले.

६०० स्क्रीन्सवर 

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्वी पंजाब आणि उत्तराखंडच्या ६०० स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. यानंतर देशाच्या इतर भागात हा सिनेमा रिलीज होईल.