रातोरात चर्चेत 'मोदीजी की बेटी' तुम्ही पाहिली का? Video Viral

कोण आहे 'मोदीजी की बेटी' ? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला मिळेल प्रश्नाचं उत्तर..   

Updated: Sep 20, 2022, 12:27 PM IST
रातोरात चर्चेत 'मोदीजी की बेटी' तुम्ही पाहिली का? Video Viral  title=

मुंबई : प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच 'मोदीजी की बेटी' हा विनोदी सिनेमा भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र 'मोदीजी की बेटी' सिनेमाची चर्चा आहे. सिनेमा 14 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विक्रम कोचर, तरुण खन्ना, पितोबाश त्रिपाठी आणि अवनी मोदी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एडी सिंग दिग्दर्शित सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सिनेमाची कथा एका मुली भोवती फिरताना दिसत आहे. पण मीडिया ट्रायल्सची ती बळी ठरले. सिनेमात काम करून यशाच्या शिखरावर पोहण्याची इच्छा बाळगणाऱ्या मुलीला एक पत्रकार मोठ्या राजकारण्याची मुलगी म्हणून सादर करतो, ज्यामुळे तिचं आयुष्यात पूर्णपणे नवीन वळण घेतं. पाहा ट्रेलर...

कॉमेडी आणि थ्रिलने भरलेली, कथेला एक मनोरंजक वळण घेते. जेव्हा बिलाल आणि तौसीफ, पीओकेमध्ये राहणारे दोन दहशतवादी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठा निर्णय घेतात. आता सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.