कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी

kangana ranaut's emergency: कंगना राणौतचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि अंधारलेला काळ - 1975 मधील इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात केवळ दिग्दर्शन करत नाही, तर त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा महत्वाचा रोलही साकारत आहेत.  

- | Updated: Jan 3, 2025, 01:46 PM IST
कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी title=

'इमर्जन्सी' चित्रपटात लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1975 मधील 'इमर्जन्सी'वर आधारित असणार आहे. कंगना राणौत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तसेचं या चित्रपटातील महत्त्वाची भूमिकाही साकारत आहे. 

चित्रपटाची कथा आणि महत्त्वाच्या भूमिका

'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना राणौत इंदिरा गांधींचा रोल साकारत आहे. या चित्रपटात त्या काळातील राजकीय परिस्थिती आणि इमर्जन्सीच्या निर्णयांचे समाजावर होणारे परिणाम यावर प्रकाश टाकत आहे. या चित्रपटात त्या काळातील तणावपूर्ण राजकीय वातावरणाची सुस्पष्ट आणि प्रभावी चित्रण केली जाईल.

संगीत आणि पटकथा

चित्रपटाचे संगीत संचित बल्हारा आणि जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे, तर पटकथा रितेश शाहने लिहिली आहे. या चित्रपटात संगीत आणि कथा दोन्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

चित्रपटाची रिलीज तारीख आणि ऐतिहासिक महत्त्व
'इमर्जन्सी' 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे, जेव्हा 'इमर्जन्सी'ला 50 वर्षे पूर्ण होईल. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या काळात भारतात इमर्जन्सी लागू करण्यात आली होती आणि हा काळ भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि काळा अध्याय मानला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतीय संविधानाच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय इमर्जन्सी (Emergency) घोषित केला होता, ज्यामुळे लोकशाही निलंबित झाली, मूलभूत अधिकारांवर प्रतिबंध आले आणि सरकारने अत्यंत कठोर कारवाई केली.

या काळात लोकांना विविध अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि विरोधकांच्या आवाजावर बंधन घालण्यात आली. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी या काळाला 'भारतीय इतिहासातील सर्वात काळा काळ' असे म्हटले होते.

हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/photos/netflix-awesome-6-science-ficti...

चित्रपटातील अन्य प्रमुख पात्रे:
अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे, जे इमर्जन्सीच्या विरोधात लढले होते. श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसेल, ज्यांनी इमर्जन्सीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला होता. तसेचं मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसेल, जे भारतीय सैन्यदलाचे प्रमुख होते आणि त्या काळातील राजकीय गोंधळावर आपले विचार मांडत असताना दिसतील.

इमर्जन्सीला 50 वर्षे पूर्ण होत असताना, हा चित्रपट त्या काळातील ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक घटनांना नवीन दृष्टिकोनातून सादर करतो. कंगना राणौतच्या दिग्दर्शनातील हे भव्य कार्य भारतीय इतिहासाच्या एक महत्त्वपूर्ण आणि वादग्रस्त प्रकरणावर प्रकाश टाकेल आणि प्रेक्षकांना इतिहासातील त्या काळाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करेल.