टीव्ही अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात

एक वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर अखेर हे प्रेमीयुगूल लग्न करणार आहेत.

Updated: Nov 8, 2019, 12:35 PM IST
टीव्ही अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात

मुंबई : आपल्या आवडतीच्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याविषयी जाणण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. ती माहिती जर त्याच्या नात्याबद्दल आणि विवाहाबद्दल असेल तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. 'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मोना सिंग गुपचूप विवाह बंधनात अडकणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

वयाच्या ३८व्या वर्षी मोना विवाह बंधनात अडकणार असल्याचा दावा पिंकव्हिलाने केला आहे. गेल्या १ वर्षापासून मोना रिलेशनशिपमध्ये आहे. एक वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर अखेर हे प्रेमीयुगूल लग्न करणार आहेत. डिसेंबर महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

परंतु यासंदर्भात भाष्य करण्यास मोनाने नकार दिला आहे. 'मी सध्या काहीही शेअर करू शकत नाही' असं वक्तव्य तिनं केलं आहे. तिचं नाव सध्या करण ओबेरॉयसोबत जोडण्यात येत आहे.