गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन, चाहत्याच्या आक्षेपार्ह कमेंटवर गायिकेचं सडेतोड उत्तर

Singer Concert Controversy :  गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन... आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर

दिक्षा पाटील | Updated: Jul 1, 2024, 11:05 AM IST
गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन, चाहत्याच्या आक्षेपार्ह कमेंटवर गायिकेचं सडेतोड उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Singer Concert Controversy :  गायिका आणि अभिनेत्री मोनाली ठाकुरला एका कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करण्यात आलं त्यानंतर ती संतापली आहे. मोनाली ठाकुर यावेळी संतापलेली होती तिनं कॉन्सर्ट मध्येच थांबला आणि त्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या त्या मुलाला खूप सुनावलं. कॉन्सर्ट दरम्यान, एका व्यक्तीनं उभ राहून मोनाली ठाकुरच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली. त्यानं सोनाली संतापली आणि खूप रागात होती.

कॉलेज कॉन्सर्टमध्ये घडला प्रकार

'दैनिक भास्कर' च्या रिपोर्टनुसार, मोनाली ठाकुर शनिवारी 29 जून रोजी भोपालमध्ये असलेल्या सेज यूनिव्हर्सिटीमध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचली होती. या कॉन्सर्टमध्ये कॉलेजच्या मुलांची खूप गर्दी झाली होती. पण तेव्हाच मोनालीला अचानक तिचं हे कॉन्सर्ट थांबवावं लागलं. त्यानंतर मोनाली तिच्या टीमला काहीतरी म्हणाली आणि संतापली. मोनालीनं गर्दीत असलेल्या एका व्यक्तीकडे इशारा केला आणि सांगितलं की त्यानं तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली. तिनं या सगळ्या प्रकरणाला शोषण म्हटलं आहे आणि सांगितलं की काही लोकं गर्दीत लपून कमेंट करतात. त्यानंतर मोनाली त्याला म्हणाली की तू खूप तरुण आहेस आणि या प्रकरणाची गोष्ट कोणाशीच करायला नको. मोनाली ठाकुरनं म्हटलं की 'तिला अशा सगळ्या घटनांवर बोलायचं होतं, आता संधी मिळाली तर तिनं यावर वक्तव्य केलं.' 

यानंतर जेव्हा संपूर्ण प्रकरण शांत झालं तेव्हा मोनाली ठाकुरचं कॉन्सर्ट पुन्हा सुरु झाला आणि सिंगरनं मग गाणं गायला सुरुवात केली. तर दुसरीकडे ज्या व्यक्तीवर तिनं आरोप लावले होते त्या व्यक्तीनं स्पष्टीकरण दिलं की त्यानं फक्त मोनालीच्या डान्स मूव्सवर कमेंट केली होती आणि काहीही आक्षेपार्ह्य सांगितलं नव्हतं. त्याचं म्हणणं आहे की काहीही नसताना मोनालीनं स्टेजवर त्याचं नाव खराब केलं. 

हेही वाचा : Renukaswamy Murder: 'डी-गॅंग', 'कैदी नंबर 6106'... नावानं अभिनेता दर्शनवर येणार चित्रपट! निर्मात्यांमध्ये शर्यत

मोनाली ठाकुर एक नॅशनल अवॉर्ड विनिंग सिंगर आहे. त्यानं आजवर अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात 'ये मोह मोह के धागे', 'सवार लूं' आणि 'जरा जरा टच मी' ही गाणी आहेत. त्याशिवाय मोनाली रिअॅलिटी शोचे परिक्षण देखील करते. तर मोनालीला 2015 मध्ये नेशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे.