कधी एकेकाळी डॉनसोबत असलेली अभिनेत्री आता 'या' ठिकाणी करते डान्स

डॉनसोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रेमसंबंध..., आता 'या' ठिकाणी धरते जुन्या गाण्यांवर ठेका  

Updated: Jun 14, 2022, 12:34 PM IST
कधी एकेकाळी डॉनसोबत असलेली अभिनेत्री आता 'या' ठिकाणी करते डान्स title=

मुंबई : 'प्यार इश्क और मोहब्बत', 'जोड़ी नम्बर वन', 'खिलौना' यांसारख्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री मोनिका बेदी डॉन अबू सालेम सोबत असलेल्या नात्यामुळे देखील तुफान चर्चेत आहे. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, दुसरीकडे त्याची एकेकाळची गर्लफ्रेंड मोनिका बेदी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

मोनिका सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील मोनिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर मोनिका प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. पाहा मोनिकाचा  डान्स व्हिडीओ... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Monica Bedi (@memonicabedi)

व्हिडीओमध्ये मोनिका 'सलामे इश्क...' गाण्यावर ठेका ठरताना दिसत आहे. मोनिकाच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

2006 मध्ये आला होता सिनेमा
अबू सालेम आणि मोनिका बेदीच्या लव्हस्टोरीवर 2006 मध्ये दिग्दर्शक अनुराग बासूने सिनेमा केला होता. या सिनेमात कंगणा राणावतने मोनिकाची भूमिका साकारली होती आणि शायनी आहुजाने अबू सालेमची भूमिका. हा कंगणाचा पहिलाच सिनेमा होता. यासाठी तिला अनेक अवॉर्ड मिळाले होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x