बालीत फिरत असलेल्या Samantha Ruth Prabhu सोबत माकड चेष्टा, झालं असं की...

Samatha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सध्या अभिनयातून ब्रेक घेतला असून स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. अशात तिनं बालीच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. याचवेळी समांथानं माकडानं कसा तिचा चष्मा चोरला हे सांगितले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 26, 2023, 06:51 PM IST
बालीत फिरत असलेल्या Samantha Ruth Prabhu सोबत माकड चेष्टा, झालं असं की... title=
(Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

Samatha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं सध्या चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. समांथा ही सध्या तिच्या या ब्रेकचा आनंद घेताना दिसते. तिची मैत्रीण अनुषा स्वानीसोबत समांथा इंडोनेशियात सुट्टीचा आनंद घेत असल्याचे आपण पाहू शकतो. दरम्यान, त्या आधी समांथानं सोशल मीडियावर तिचे इशा फाऊंडेशनच्या आश्रमातील काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये समांथा ध्यान करताना दिसली. आता समांथानं तिचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे चांगलेच चर्चेचाविषय ठरले आहेत. 

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून तिच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहता त्यातील एका फोटोत तिनं ऑलिव्ह रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिच्या मागे एक माकड असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना तिनं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे की त्या माकडानं कशा प्रकारे तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पोझ दिली आणि त्यानंतर तिचे ग्लेअर्स कसे चोरले. समांथाने त्यानंतर माकडाचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन देत समांथा म्हणाली, गॉगलचा चॉईसवरून कॅप्शन लिहीत म्हटलं , माकडाला चांगल्या गोष्टी आवडतात'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काल म्हणजे बुधवारी समांथा रुथ प्रभू तिची मैत्रिण अनुषासोबत बालीतील उलुवाटू येथे तिच्या दुसऱ्या ट्रिपसाठी गेली होती. त्यांनी त्यांच्या रोड ट्रिपचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या नंतरचा व्हिडिओ क्लिपमध्ये, समंथा धबधब्याच्या काठावर उभी होती ते पाहायला मिळत आहे. त्याशिवाय समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समांथा ही समुद्रासमोर उभी असल्याचे दिसून येत आहे. तर त्याशिवाय समांथानं एक कोट देखील शेअर केलं आहे. Uluwatu चा अर्थ काय आहे हा त्यात सांगण्यात आला आहे. 

Monkey stole Samatha Ruth Prabhu s Sunglasses at bali trip actress says he has a great taste

मायोसिटिस या प्रकृतीच्या आजारामुळे समांथानं चित्रपट आणि अभिनयातून ब्रेक घेतला आहे. तिचे शेवटचे दोन सिनेमे, 'यशोदा' आणि 'शकुंतलम' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तिने आधीच तिच्या ब्रेकची घोषणा केली आहे आणि अलीकडेच 'सिटाडेल' या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याशिवाय तिचा आणखी एक चित्रपट येत असून त्या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. त्या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर समांथानं  तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक घेतला असून हा ब्रेक किमान सहा महिन्यांचा घेईल असा अंदाज आहे.