मुंबई : टीम इंडियाने पहिल्यांदा १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ सिनेमा येत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार असून याची सिनेमाची घोषणा मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आली.
त्यानंतर या सिनेमाची उत्सुकता आता चांगलीच ताणली गेली असताना या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आलाय.
रिलायन्स एन्टरटेमेंट आणि फॅन्टम फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ५ एप्रिलला रिलीज होणार आहे. टीम इंडियाच्या या ऎतिहासिक विजयावर सिनेमा करण्यासाठी कबीर खान याने चांगलीच तयारी केली आहे.
या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह हा टीम इंडियाचा कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारत असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. रणवीरने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या पण अशी भूमिका तो पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे ही महत्वाची भूमिका तो कसा साकारेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
दिग्दर्शक कबीर खान म्हणाला की, ‘जेव्हा मी टीम इंडियाने १९८३ चा वर्ल्डकप जिंकला तेव्हा मी शाळेत होतो. मला जराही अंदाज नव्हता की, भारतात क्रिकेटची परिभाषाच बदलेल. एक फिल्ममेक म्हणून या सिनेमाची कथा साकारणे खूपच रोमांचक आणि उत्साह देणारं काम आहे’.