Movie Ticket in 75 Rs: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणिन आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा सिनेमा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचं तिकीट प्रचंड महाग आहे. राजधानी दिल्लीत सिनेमाची तिकिटे 2100 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. सिनेमाचं तिकीट महाग असल्यामुळे कित्येक जण पाहायला देखील जात नसतील पण आता तुम्हाला फक्त 75 रुपयांमध्ये आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा पाहता येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे ही ऑफर फक्त एका दिवसासाठी आहे. 16 सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही होणताही सिनेमा फक्त 75 रुपयांमध्ये पाहाता येणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात देशभरातील चित्रपटगृहे जवळपास दीड वर्षे बंद होती. यानंतर, ते 16 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहे उघडण्यात आले. यानंतर सिनेमागृह मालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. म्हणूनच असोसिएशनने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहू शकता. PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage and City Pride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight यासह देशभरातील सुमारे 4000 सिनेमागृहांमध्ये 75 रुपयांमध्ये कोणत्याही सिनेमाचं तिकीट पाहू शकता. मात्र, ही ऑफर सिंगल स्क्रीन सिनेमांमध्ये उपलब्ध असणार नाही.
कसा करणार तिकीट बूक?
जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट बुक करू शकता. सिनेमा हॉलमध्ये जाऊन काउंटरवरून तिकीट काढलं तर ते 75 रुपयांना मिळेल. पण ऑनलाइन तिकिट बूक करत असाल तर, तुम्हाला अधीक पैसे मोजावे लागतील. म्हणजे ऑनलाइन तिकिटाची किंमत 100 रुपये असेल.