आमिर आणि मिस्टर फैझु करताहेत अंदाज अपना अपना..हा पाहा व्हिडीओ

त्याचा व्हिडीओ फैझलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे,जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

Updated: Aug 7, 2022, 06:40 PM IST
आमिर आणि मिस्टर फैझु करताहेत अंदाज अपना अपना..हा पाहा व्हिडीओ   title=

AAMIR KHAN,MR.FAIZU:  सध्या बॉक्स ऑफिसवर लाल सिंग चड्ढा ची बरीच चर्चा आहे.आमीर खानसुद्धा त्याच्या या नवीन सिनेमाला घेऊन फारच उत्सुक असल्याचं दिसत आहे. 
आमिर खान या नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे .प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा वापर आजकाल सर्व स्टार्स करताना पाहायला मिळत आहे. 
अलीकडेच आमिर खान(AAMIR KHAN) सोशल मीडिया स्टार फैजल शेख उर्फ ​​मिस्टर फैजूसोबत(MR.FAIZU) त्याच्या 'अंदाज अपना अपना' चित्रपटातील एक सीन पुन्हा रिक्रियेट करताना दिसला.त्याचा व्हिडीओ फैझलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे,जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

फैझल सोशल मीडियावरील फेमस चेहऱ्यांपैकी एक आहे नुकतेच त्याने आमिर खान सोबतचे काही फोटोस आणि व्हिडीओस शेर केले आहेत  व्हिडिओमध्ये आमिर आणि फैसल मिळून  'अंदाज अपना अपना'मधील एक सीन रिक्रिएट करत आहेत.फैजल सलमान आणि आमिरचे डायलॉग बोलत आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FAISAL SHAIKH (@mr_faisu_07)

  हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे आणि केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटी देखील कमेंट करत आहेत.

1994 मध्ये आलेला 'अंदाज अपना अपना' राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. त्याचवेळी आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'(FOREST GUMP)चा  रिमेक आहे,