मुंबई : दिग्दर्शक अऩिज बज्मी यांचा मुबारकाँ हा सिनेमा आजपासून बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमावणार आहे. खरंतर अऩीस बज्मी हे कायमच फॅमिली एंटरटेनर सिनेमांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात.. सिंग इज किंग, वेलकम, नो एंट्री सारखे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेत.. कसा आहे मुबारका.. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का,, काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया.,,
करण आणि चरण हे दोघं एकसारखेच दिसत असले तरी ते एकाच घरातले पण एकमेकांचे सख्खे भाऊ नाहीत. त्यामागे एक वेगळीच गोष्ट आहे. कहाणीत खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा या दोघांसाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरु होतो, खरंतर या दोघांनी आधीपासूनच आपली सेटिंग करुन ठेवलीये.. त्यांचा हा मोठा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एंट्री होते काका करतार सिंगची, जी भूमिका साकारलीये अभिनेता अनिल कपूरनं.. यानंतर काय धमाल उडते हे अनुभवण्यासाठी तुम्हाला मुबारकाँ हा सिनेमा पहावा लागेल..
या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर आणि अनिल कपूर दोघांचे डबल रोल आहेत.. मुबारका सिनेमात अनिल कपूर ख-या अर्थानं भाव खाउन जातो. त्यांचा टायमिंग, त्यांचा अभिनय, स्क्रीनवरील त्यांचा वावर कमाल आहे..
मुबारकाचा फर्स्ट हाफ धमाल झालाय. कलाकारांचा अभिनय, कॉमेडी टायमिंग छान आहे.. मात्र मुबारकाचा उत्तरार्ध जरा लांबलाय, जो खरंतर आणखी क्रिस्प करता आला असता. सिनेमाचा क्लायमॅक्सही जरा फसलाय.. मुबारकाँ हा सिनेमा एक संपूर्ण फॅमिली एंटरटेनर सिनेमा आहे. त्यामुळे एकदातरी सिनेमा पहावा.. हो पण सिनेमा पाहताना फार डोकं लावण्याचा प्रयत्न करु नये, हाती निराशा येईल.. इनशॉर्ट हा एक टाईमपास सिनेमा आहे.. मुबारका या सिनेमातील हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला मिळतायत 3 स्टार्स.