मुकेश अंबानींच्या सुनेचा ग्लॅमरस लूक

पाहा ग्लॅमरस फोटो 

Updated: Nov 17, 2019, 07:11 PM IST
मुकेश अंबानींच्या सुनेचा ग्लॅमरस लूक

मुंबई : अंबानी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कुठेही गेली तरी ती चर्चेत ही असतेच. मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) सून आणि आकाश अंबानीची (Akash Ambani) पत्नी श्लोका मेहता (Shloka Mehta) सध्या चर्चेत आहे. श्लोका मेहताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत श्लोकाअतिशय सुंदर दिसत आहे. 

श्लोकाच्या ड्रेसिंग सेन्सची सगळीकडेच चर्चा असते. अनेकदा श्लोका ट्रेडिशनल ड्रेस म्हणजे पंजाबी ड्रेस किंवा साडीमध्येच दिसली आहे. पण पहिल्यांदा वेस्टर्न आऊट फिटमध्ये श्लोका दिसत आहे. या फोटोत श्लोका लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये श्लोकाने लाल रंगाची लिप्स्टिक लावली असून हलका मेकअप देखील केला आहे. 

श्लोकाचा हा फोटो तिच्या मेकअप आर्टिस्ट प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. या फोटोत श्लोका आपल्या मेकअप आर्टिस्टसोबत दिसत आहे. 

या अगोदर श्लोका दिवाळी पार्टीत देखील अशी ग्लॅमरस दिसली होती. अंबानी कुटुंबियांनी दिवाळीच्या अगोदर पार्टी दिली होती. ज्यामध्ये श्लोका आणि आकाश अंबानी एकत्र दिसले होते. 

आकाश आणि श्लोकाचं लग्न यंदाच 2019 मार्च मध्ये झालं आहे. या दोघांच लग्न अतिशय शाही पद्धतीने पार पडलं. श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोकाचं संपूर्ण शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत झालं आहे. यानंतर तिने लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि पॉलिटीकल सायन्समध्ये तिने लॉचं शिक्षण घेतलं आहे. 

2014 पासून श्लोका मेहता ब्लू फाऊंडेशनचे संचालक हे पद सांभाळत आहे. तसेच कनेक्टफॉर नावाच्या संस्थेत सह-संचालक म्हणून देखील कार्यरत आहे.