मुंबई पुणे मुंबई 3 मधील 'कुणी येणार गं' गाणं रिलीज

पाहा हे सुंदर गाणं 

मुंबई : सतीश राजवाडे दिग्दर्शित 'मुंबई पुणे मुंबई' हा अतिशय लोकप्रिय सिनेमा. या सिनेमात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांना पहायला मिळाली. एखाद्या सिनेमा दुसरा भाग येणं आणि तो लोकप्रिय होणं हेच त्या सिनेमाचं यश असतं. पण मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा आता तिसरा भाग येत आहे. एखाद्या सिनेमाची एवढी लोकप्रियता पहिल्यांदाच मराठीत अनुभवायला मिळत आहे. 

पाच वर्षांपूर्वी मुंबई पुणे मुंबई या सिनेमाला भरपूर यश मिळालं. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी मुंबई पुणे मुंबई चा दुसरा भाग आला. यामध्ये गौतम आणि गौरीच्या लग्नाची कथा सांगण्यात आली. आता तिसऱ्या भागात या गौरी - गौतमच्या आयुष्याचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'कुणी येणार गं' हे गाणं रिलीज झालं आहे. 

यामध्ये गौरी म्हणजे मुक्ता बर्वेच्या डोहाळे जेवणाचा प्रसंग दाखवण्यात येणार आहे. गौतम - गौरीच्या संसारावर नवी कळी फुलणार आहे. आणि या नवीन पाहुण्याचं स्वागत कुटुंबातील सगळेचजण करणार आहेत.