Mirzapur 3 Bonus Episode: 'मिर्झापूर' च्या तीनही भागांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं आहे. 'मिर्झापूर 3' वेबसीरिजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीझनमध्ये, लोक त्यांच्या आवडत्या पात्राला म्हणजेच मुन्ना भैय्याला मिस करत आहेत. अशा परिस्थितीत 'मिर्झापूर'च्या दुनियेत मुन्ना भैय्याला परत आणण्याची मागणी चाहत्यांनी केली. ज्या प्रेक्षकांनी 10 भागांचा आनंद घेतला त्यांच्यासाठी प्राइम व्हिडीओ आता एक बोनस भाग घेऊन येत आहे. ज्यामध्ये मुन्ना भैय्याचे पुनरागमन झाल्याचं उघड झाले आहे.
दरम्यान, प्राइम व्हिडीओने त्यांच्या इन्स्टाग्रामवर 'मिर्झापूर 3'च्या बोनस एपिसोडचा टीझर रिलीज केला आहे. त्यात प्रेक्षकांचा लाडका मुन्ना भैय्या दिसला आहे. म्हणजेच मुन्ना भैय्या 'मिर्झापूर'मध्ये परतत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'मिर्झापूर 3' चा बोनस भाग कधी रिलीज होणार?
'मिर्झापूर 3' च्या बोनस एपिसोडच्या टीझरमध्ये मुन्ना भैय्या दिसत आहे. या टीझरमध्ये तो म्हणत आहे की, आम्ही काय गेलो संपूर्ण गोंधळ उडाला. मी ऐकले की आमचे निष्ठावंत चाहते आम्हाला खूप मिस करत आहेत. 'मिर्झापूर 3' सीझनमध्ये तुम्ही काही गोष्टी मिस केल्या आहेत. असतील तर आम्ही त्या शोधून काढल्या आहेत. फक्त तुमच्यासाठी, मुन्ना त्रिपाठीच्या सौजन्याने.
कारण आपण आधी करतो. नंतर विचार करतो. या टीझरसोबत त्यांनी एक कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'गोंधळ होणार आहे. कारण बोनस एपिसोड येत आहे. प्राइमवर मिर्झापूरचा बोनस भाग 30 ऑगस्ट रोजी पाहता येणार आहे.
'मिर्झापूर 3'मधील स्टार कास्ट
एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेली, 'मिर्झापूर 3' सीझन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी दिग्दर्शित केली आहे. वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, हर्षिता शेअर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिक आणि मनु ऋषि यांचा समाविष्ट आहे.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.