'तुझ्याशिवाय... ' अक्षय कुमारनं असं काय म्हटलेलं की, शिल्पा शेट्टी लाजली?

Akshay Kumar, Shilpa Shetty Viral Video:बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली. पण आता अचानक त्यांच्या ब्रेकअपनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. अक्षय कुमारने या व्हिडीओमध्ये असं काही म्हटलं आहे ज्यामुळे शिल्पा शेट्टी चक्क लाजली. नक्की ते दोघे एकमेकांना काय म्हणाले जाणून घेऊया. 

Updated: Aug 29, 2024, 07:24 PM IST
'तुझ्याशिवाय... ' अक्षय कुमारनं असं काय म्हटलेलं की, शिल्पा शेट्टी लाजली?  title=

Akshay Kumar, Shilpa Shetty Viral Video: बॅालिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअप नवं नाही.  नव्वदच्या दशकात असंच एक गाजलेलं प्रेमप्रकरण म्हणजे बॅालिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि मिस्टर खिलाडी अक्षय कुमारचं. 1994 मध्ये 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटाच्या निमित्ताने दोघं एकत्र आली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. अक्षय-शिल्पा एकमेकांना डेट करत होते असं बोललं जात होतं. पण हे नात फार काळ टिकल नाही. काही दिवसातच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.

बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली. पण आता अचानक त्यांच्या ब्रेकअपनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. अक्षय कुमारने या व्हिडीओमध्ये असं काही म्हटलं आहे ज्यामुळे शिल्पा शेट्टी चक्क लाजली. नक्की ते दोघे एकमेकांना काय म्हणाले जाणून घेऊया. 

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या एका व्हिडीओने सोशल मीडीयावर धुमाकूळ घातलीय. हा व्हिडीओ  रेडिट या सोशल मीडीया प्लॅटफॅार्मवर व्हायरल होत असून  शिल्पा शेट्टी स्टेजवर उभी आहे आणि अक्षय कुमार तिथे येतो. ते दोघे एकमेकांना पाहून हसतात. त्यानंतर शिल्पा शेट्टी अक्षय कुमारला म्हणते, 'तू तुझ्या करिअरमध्ये खूप स्टंट्स केले आहेस'. शिल्पाच्या या बोलण्यावर अक्षय उत्तर देत म्हणतो, 'हे तुझ्याशिवाय जास्त चांगलं कोणाला माहित'. अक्षयच्या या बोलण्याने शिल्पा लाजते आणि काही सेकंदासाठी शांत होते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ब्रेकअपनंतर हे दोघे एकमेकांशी कसं डील करतात असा सवाल विचारला गेला आहे.

How can these people can deal with each Others after break up
byu/shawerma114 inBollyBlindsNGossip

 

हेही वाचा : 'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या ब्रेकअपनंतर ते दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यांच्या ब्रेकअपनंतर दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने 'अक्षयने मला धोखा दिला' अस वक्तव्य केलं होतं. अक्षय कुमारने 2001 मध्ये ट्विंकल खन्ना सोबत लग्न केलं. आता अक्षयला दोन मुलं असून त्यांचं नाव आरव आणि नितारा आहे.  शिल्पा आणि अक्षयच्या ब्रेकअपला ट्विंकल खन्ना कारणीभूत असल्याच म्हटलं जातं. शिल्पा शेट्टीनेही बिजनेसमॅन राज कुंद्रासोबत संसार थाटला आहे. शिल्पा शेट्टी  राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर अल्लाहबादियाच्या एका पॉडकास्ट एपिसोडमध्ये अक्षयने ब्रेकअपबरोबर तो कसं डील करतो त्याच्याविषयी सांगितलं. याआधी अक्षयचं नाव 2-3 अभिनेत्रींसोबत जोडल गेल होतं, त्यांच्याशीही अक्षयचं ब्रेकअप झालं होतं.