मुंबई : 90च्या दशकातील प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 22 एप्रिल रोजी त्यांनी मुंबईच्या रहेजा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आता त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा संजीव राठोडला देखील कोरोनाची लागण झाली आहे. श्रवण यांच्या पत्नी आणि मुलावर मुंबईच्या सेव्हेन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गायक उदीद नारायण यांनी श्रवण कुंभमेळ्यात गेले होते असं सांगितलं. कुंभमेळ्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली असं देखील सांगण्यात येत आहे.
जेव्हा श्रवण मुलगा संजीवच्या संपर्कात आले तेव्हा त्याने वडिलांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. पण श्रवण यांनी ऐकलं नाही. ते फक्त म्हणाचे तू डॉक्टरही नाही आणि माझा बाप देखील नाही. अशी माहिती संजीव राठोडने दिली आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संजीवने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
संजीव स्वतःच्या आईच्या प्रकृतीबद्दल म्हणाला, 'आमच्या प्रकृतीत हळू-हळू सुधारणा होत आहे. आईची काळजी वाटते. पण दोघांची प्रकृती स्थिर आहे. सौम्य लक्षणं आहे. कोरोना काळात आम्ही जे गमावलं आहे. ती जागा कोणीही भरून काढू शकतं नाही.'
संजीव पुढे म्हणाला, 'श्रवण राठोड यांना धर्मिक ठिकाणी जाण्याची आवड होती. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे हे माहित असून देखील ते अनेक ठिकाणी देवदर्शन करून आले. कुंभमेळ्याबद्दल देखील त्यांच्या मनात उत्सुकता होती. आम्ही त्यांना सांगितलं पण त्यांनी काहीही ऐकलं नाही.'
गेल्या सहा महिन्यांत डॉक्टरांकडून त्याची कोणतीही तपासणी झाली नाही. तर त्याची तब्येत ठीक नसल्याचे त्याला माहित होते. काही दिवसांनी त्यांना श्वास घेण्यास अडथळे येवू लागले त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना बोलावलं आणि रूग्णालयात दाखल झाले. '
पुढे संजीवला, वडील आणि तुम्ही वेगळ्या रूग्णालयात का उपचार घेत होते असा प्रश्न विचारल्यानंतर. संजीव म्हणाला. 'श्रवण यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली, तेव्हा आम्हाला लक्षणं नव्हती. त्यानंतर आम्हाला लक्षणं जाणवू लागली. अनेक प्रयत्नांनंतर आम्हाला सेव्हेन हिल्स रूग्णालयात बेड मिळाले....'
जेव्हा श्रवण यांच्या निधनाची बातमी संजीवच्या कानावर आली तेव्हा त्याने आईला काही सांगितलं नाही. नंतर काका आणि काकीच्या सल्ल्यानंतर संजीवने वडिलांच्या निधनाची बातमी आईला सांगितली.