धक्कादायक! 'चला हवा येऊ द्या'चे सर्वेसर्वा निलेश साबळे यांच्या अँकरींगला एका मुलीचं चॅलेंज

झी मराठी  वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' मध्ये या आठवड्यात कलाकारांची धम्माल पाहायला मिळणार आहे. 

Updated: Oct 23, 2021, 08:40 PM IST
धक्कादायक! 'चला हवा येऊ द्या'चे सर्वेसर्वा निलेश साबळे यांच्या अँकरींगला एका मुलीचं चॅलेंज

मुंबई : झी मराठी  वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' मध्ये या आठवड्यात कलाकारांची धम्माल पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात माझी तुझी रेशीम गाठ मधील छोटी परी हजेरी लावणार आहे. याचाच एर प्रोमो झी मराठीने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. पण यावेळी गोंडस परी डॉ, निलेश साबळेसोबत अँकरींगवरुन भांडताना दिसतेय.

चला हवा येऊ द्या च्या सेटवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतली परी अवतरली...मात्र यावेळी परी आणि निलेश साबळे यांच्यात चांगलीच जुंपली. उत्सव नात्यांचा या सोहळ्याचं अँकरींग कोण करणार यावरून या दोघांमध्ये भांडण झालं...बिस्कीट पुड्यात पोरगी पटवली असं या व्हिडिओच्या शेवटी परी म्हणताना दिसते.

या प्रोमो मध्ये परी म्हणते, नमस्कार मी तुमची लाडकी परी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येवू द्या... यावर निलेश साबळे परीला विचारतात तु झी मराठी अवॉर्डचं अँकरींग करणार आहेस का? यावर परी म्हणते हो! यावरुन निलेश म्हणतात अँकरींग तर मी करणार आहे यावर परी म्हणते मी करणार अँकरींग, यावंर निलेश परीला सांगतात मला फोन आला होता चॅनलचा, परी म्हणते मला फोन आला होता, यावर निलेश म्हणतात मला पैसे मिळाणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर परी म्हणते मला देणार आहेत यांवर निलेश म्हणतात काय देणार आहेत. यावर परी म्हणते बिस्कीट पुडा आणि मंचावर उपस्थित सगळे हसू लागतात तेवढ्यात निलेश म्हणतात बिस्कीट पुढ्यात पोरगी पटवली. याच्यांतलं हे गोड भांडण सध्या सोशल मीडियावर चांगलच गाजतय.

हा एपिसोड आपल्याला या सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पहायला मिळेल. याशिवाय चला हवा येऊ द्याचे विनोदवीर आपल्या विनोदाने हास्याचा तडका लावणार आहेत.