या कारणामुळे नागा चैतन्यने सोडलं घर, एक महिन्यापासून येथे वास्तव्य

नागा चैतन्य आणि सामंथाच्या घटस्फोटानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे

Updated: Oct 12, 2021, 10:09 PM IST
या कारणामुळे नागा चैतन्यने सोडलं घर, एक महिन्यापासून येथे वास्तव्य title=

मुंबई : जेव्हा दक्षिणात्य सिनेमातील नागा चैतन्य आणि सामंथा रूथ प्रभू या कपलने वेगळं होण्याची घोषणा केली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आणि जवळच्यांना सर्वात मोठा धक्का बसला. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बरीच अटकळ होती. त्यानंतर दोघांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी घटस्फोटाची घोषणा केली. आता हे कपल वेगळं झालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अशी बातमी आहे की, या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर नागा चैतन्य हैद्राबादच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतोय. तर सामंथा त्याच घरात राहत आहे जिथे ती एकेकाळी नागा चैतन्यसोबत राहत होती मीडिया रिपोर्टनुसार, असंही म्हटलं जातयं की, नागा चैतन्यने हैद्राबादच्या सगळ्यात प्रसिद्ध जागांपैकी एक असलेल्या ज्युबिली हिल्समध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. ज्यांचं रेनोवेशनचं काम या दिवसात सुरू आहे. नवीन घराचं रेनोवेशनचं काम पूर्ण होताच चैतन्य तिथे शिफ्ट होईल. तर समंथा तिचं निवासस्थान हैद्राबादच्या गचीबोवली येथील त्याच हवेलीमध्ये राहील.

नागा चैतन्यने दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री तब्बूकडून ही हवेली खरेदी केली होती. लग्नानंतर तो या मोठ्या हवेलीत समंथासोबत राहत होता. मात्र, घटस्फोटाच्या घोषणेच्यावेळी आणि त्याआधीही नागा चैतन्य सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीयेत. समंथा बऱ्याचदा काही ना काही पोस्ट शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी घटस्फोटाच्या अटकळांवर आपल्यावरील आरोपांवर आक्षेप घेतला होता.

असं म्हटलं जात होतं की, सामंथाचं तिच्या स्टायलिस्ट प्रीतमसोबत अफेअर आहे, ज्यामुळे हे लग्न तुटलं. असंही म्हटलं जात होतं की, समंथाने अनेक गर्भपात केले कारण तिला आई बनण्याची इच्छा नव्हती. सामंथाने या सगळ्या अफवांना जोरदारपणे नकार दिला होता आणि म्हटलं होतं की, घटस्फोट ही एक अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे आणि तिच्यावर अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं आहे.