#NamasteyTrump : राजकारणातच नाही तर अभिनयातही तरबेज डोनाल्ड ट्रम्प

या सिनेमांत साकारलेल्या भूमिका 

Updated: Feb 24, 2020, 01:49 PM IST
#NamasteyTrump : राजकारणातच नाही तर अभिनयातही तरबेज डोनाल्ड ट्रम्प title=

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलानियया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनेरसोबत अहमदाबादमध्ये पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच स्वागत केलं. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प 'NamasteTrump' या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उत्तम कलाकार देखील आहे. पाहूया अभिनेता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अभिनय क्षेत्रातील परिचय...

स्पिन सिटी 

अमेरिकेच्या सिटकॉम टेलिव्हिजनची सिरीज 'स्पिन सिटी'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनय केला आहे. 17 सप्टेंबर 1996 ते 30 एप्रिल 2002 पर्यंत ही सिरीज एबीसीवर प्रसारित झाली होती. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प मायकल फॉक्ससोबत दिसले होते. टीआरपीच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्यानंतर मे 2002 मध्ये ही टीव्ही सिरीज बंद करण्यात आली. 

सेक्स ऍण्ड द सिटी 

न्यूयॉर्क शहरात घडलेली आणि चित्रित झालेली 'सेक्स ऍण्ड द सिटी'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनय केला आहे. चार महिलांच्या जीवनावर आधारित हे आत्मचरित्र आहे. 1999मध्ये ट्रम्प या शोमधून पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले. ते या शोच्याच्या सिझन 2मधील एका एपिसोडमध्ये दिसले. 

लिटिल रासकल्स 

हा सिनेमा 1994 मध्ये आला होता. या सिनेमात ट्रम्प यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. सिनेमात ट्रम्प आपल्या मुलाशी संवाद साधताना दिसले होते. 

सडनली सुसेन 

हा टीव्ही शो 1997 मध्ये ऑन एअर गेला होता. शोच्या एका एपिसोडमध्ये डोनाल्ड ट्रम्प एका बिझनेसमनच्या कॅरेक्टरमध्ये दिसले. त्यांचा हा रोल अतिशय लोकप्रिय ठरला. 

होम अलोन 2 

होम अलोन 2 हा 1992 मध्ये बनलेला अमेरिकेतील कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमातही त्यांनी कॅमिओ केला होता. या सिनेमातील काही भाग हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलमध्ये शूट झाला आहे.