नाना पाटेकर एकाचं वेळी दोन अभिनेत्रींच्या प्रेमात, पण तो एक क्षण आणि...

त्या काळातील नाना पाटेकर यांची 'लव्हलाईफ'  

Updated: Jan 3, 2022, 08:56 AM IST
नाना पाटेकर एकाचं वेळी दोन अभिनेत्रींच्या प्रेमात, पण तो एक क्षण आणि... title=

मुंबई : झगमगत्या विश्वात प्रेम, मैत्री, ब्रेकअप, झगडे इत्यादी गोष्टी घडत असतात. पण घडलेल्या त्या घटनांची चर्चा मात्र कायम रंगलेली असते. या सर्वांमध्ये सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपकडे चाहत्यांचं विशेष  लक्ष असतं. आपल्या आवडत्या अभिनेता, अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेवू. 

नाना पाटेकर यांनी कायम त्यांच्या अभिनयाने आणि डायलॉगमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण एक काळ असा होता जेव्हा नाना त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होते. त्या काळी नाना एकाचं वेळी एक नव्हे तर दोन अभिनेत्रींच्या प्रेमात मग्न होते. पण त्यांचं प्रेम जास्त काळ टिकू शकलं नाही. 

त्या काळी नाना पाटेकर यांचे अभिनेत्री आयशा झुल्कासोबतचं प्रेमप्रकरण चर्चेत आलं. पण त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचं नातं बिघडलं. सांगायचं झालं तर, आयशा झुल्कापूर्वी नाना पाटेकर अभिनेत्री मनीषा कोईरालाला डेट करत होते. आयशाच्या सौंदर्यासमोर त्यावेळी सर्वच अभिनेत्री फेल होत्या. 

आयशाने नाना पाटेकर यांच्यासोबत 'आंच' चित्रपटात काम केले आणि या चित्रपटानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या अनेक गोष्टी समोर आल्या. यादरम्यान नानांच्या आयुष्यात अभिनेत्री मनीषा होती, पण असं झालं की मनीषाने नानांना आयशासोबत पाहिलं आणि तिला नानांच्या अफेरबद्दल कळालं. 

यानंतर नाना पाटेकर आणि मनीषा यांच्यात दुरावा निर्माण झाला. मनीषासोबत संबंध तुटल्यानंतर नाना आयशासोबत लिव्ह रिलेशनशिपमध्ये होते. पण आयशा आणि नाना हे नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही.