नरेंद्र मोदींनी लिहली हेमा मालिनींच्या आत्मचरित्रात प्रस्तावना

अभिनेत्री हेमा मालिनी येत्या 16 ऑक्टोबर रोजी 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

Updated: Oct 14, 2017, 06:25 PM IST
नरेंद्र मोदींनी लिहली हेमा मालिनींच्या आत्मचरित्रात प्रस्तावना  title=

मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी येत्या 16 ऑक्टोबर रोजी 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

 वाढदिवसाबरोबर यंदा हेमा मालिनींच्या हिंदी सिनेसृष्टीतल्या पदार्पणालाही 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. या दोन्ही गोष्टींचे सेलिब्रेशन करताना यंदा हेमा मालिनी त्यांचे आत्मचरित्र चाहत्यांसमोर आणणार आहेत. 

 'बियॉन्ड द ड्रीमगर्ल' हे हेमा मालिनींचे आत्मचरित्र आहे. स्टारडस्टचे पूर्व संपादक  राम कमल मुखर्जी यांनी या पुस्तकाचे काम पाहिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आत्मचरित्रामध्ये प्रस्तावना लिहली आहे. 
 
 हेमा मालिनी उत्तम शास्त्रीय नृत्यांगणा, अभिनेत्री आणि सोबतच राजकारणी आहेत. त्यांच्या आयुष्यातील या तिन्ही टप्प्यांवरील लोकांना फारसे माहित नसलेले  किस्से रसिकांसमोर त्यांच्या आत्मचरित्रातून येणार आहेत. हेमामालिनींचे आत्मचरित्र २३ भागांमध्ये विभागले आहे.