close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Sacred Games : दुसऱ्या सिझनमध्ये असणार हे कलाकार

हे कलाकार पाहायला मिळणार 

Sacred Games : दुसऱ्या सिझनमध्ये असणार हे कलाकार

मुंबई : नेटफ्लिक्स चॅनलवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरीज सध्या धुमाकूळ घालत आहे. रिव्हू एग्रिरेटर 'रॉटेन टोमॅटो' ने या वेब सिरीजला 100 टक्के फ्रेश रेटिंग दिली आहे. यामध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची जोरदार चर्चा रंगली आहे. पटकथेनुसार या वेब सिरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्धीकीच्या कॅरेक्टरचा म्हणजे गणेश गायतोंडेचा मृत्यू झाला आहे. आता त्याची गोष्ट फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येत आहे. शोमध्ये अनेक न्यूड आणि लव मेकिंग सीन्स देखील आहेत. ते इंटरनेटवर लीक झाले असून आता व्हायरल होत आहे.  

दुसऱ्या सिझनमध्ये असणार हे कलाकार? 

या वेब सिरीजचं पहिलं सिझन संपूल असून दुसऱ्या सिझनची तयारी सुरू झाली आहे. निर्मात्यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पंकज त्रिपाठी यांना या वेब सिरीजशी जोडलं आहे. त्यांचा रोल नवाज आणि सैफ यांच्यापेक्षा अधिक असल्याच सांगण्यात येत आहे. शोमध्ये या 'गुरूजी' ची भूमिका असून 'मास्टरमाइंड' म्हटलं जात आहे. 

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये पंकज त्रिपाठीचा आवाज देण्यात आला होता. पहिल्या सिझनमध्ये फ्लॅशबॅकमध्ये जो आवाज ऐकू येतो तो पंकज त्रिपाठी यांचा आहे. आता शोच्या पुढील तीन सिझनमध्ये पंकज त्रिपाठी अभिनय करताना दिसणार आहे. 'सेक्रेड गेम्स' चे चार सिझन असून प्रत्येक सिझनमध्ये आठ एपिसोडमध्ये आहे. 

पहिला सिझन रिलिज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शोचे निर्माते आणि नवाजुद्दीन विरोधात दिल्ली न्यायालयात केस सुरू आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. काँग्रेस नेता राजीव सिन्हा यांनी केस फाईल केली आहे. पहिल्या सिझनमध्ये काँग्रेस नेता आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप केला गेला आहे.