Nawazuddin Siddiqui:जेव्हा वडिलांनी त्याला सांगितलं, "आता या पुढे तू घरी यायचं नाही"

सगळे सामाजिक नियम मोडत नवाजुद्दीनने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: May 19, 2021, 07:20 PM IST
Nawazuddin Siddiqui:जेव्हा वडिलांनी त्याला सांगितलं, "आता या पुढे तू घरी यायचं नाही"  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपलं स्थान जास्त काळ टिकवणं सोपं नाही. विशेषत: जेव्हा आपल्याकडे सिक्स पॅक अ‍ॅब नसतात, आपण सुंदर नसतो. मात्र नायक होण्याचे सगळे सामाजिक नियम मोडत नवाजुद्दीनने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांने सांगितलं की, पडद्यावर सुंदर दिसण्यापेक्षा तुमच्याकडे टॅलेंट असणं फार महत्वाचं आहे.

नवाझचा जन्म
नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील कस्बे बुढ़ाना या गावात 19 मे 1974 रोजी झाला. त्याचे वडील शेतकरी होते आणि त्याला सात भाऊ आणि दोन बहिणी आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबातील कोणाचाही अभिनयाशी काहीच संबंध नव्हता. पण ते म्हणतात ना! की तुमच्या नशिबात जे काही आहे ते होणारच...

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ईथे घेतलं शिक्षण
नवाजुद्दीनने गुरुकुल कांगड़ी विद्यापीठ, उत्तराखंडमधील हरिद्वार येथून विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी पेट्रोकेमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून काम करायला सुरवात केली. पण नवाझुद्दीनला ही नोकरी 9 ते 5 आवडली नाही. यानंतर 1996मध्ये तो दिल्लीमध्ये गेला आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्याने प्रवेश घेतला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर नवाज मुंबईत पोहोचला.

वडील झाले होते नाराज
नवाजची आपल्या संघर्षाच्या दिवसांत काहीही करण्याची इच्छा होती. चित्रपटांमध्ये एट्री घेतल्यानंतरही नवाज वेटर, चोर, यासारख्या छोट्या छोट्या भूमिका साकारायचा आणि या भूमिका साकारताना नवाजला कधीच कुठलीच लाज वाटली नाही. नवाजने 'शूल', 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'सरफरोश' सारख्या चित्रपटांमध्ये ही छोटया भूमिका साकारल्या.

एका मुलाखतीत नवाझुद्दीनने सांगितलं की, जेव्हा संघर्षाच्या काळात चित्रपटात लहान भूमिका साकारल्या. तेव्हा या भूमिका पाहून त्याचे वडील निराश झाले. एकदा ते इतके निराश झाले की, त्यांने स्पष्टपणे सांगितलं की, आता तु घरी यायचं नाही, तुझ्यामुळे आम्हाला बाहेर फिरायला लाज वाटते.

भरपूर नाव कमवलं
नवाजुद्दीन सिद्दीकीला अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला 'फिरक', 'न्यूयॉर्क' आणि 'देव डी' सारख्या चित्रपटांमध्ये काम मिळालं. सुजॉय घोष यांच्या 'कहानी' मधे त्यांच्या कामाचं कौतुक झालं.

'गँग्स ऑफ वासेपुर'नंतर नवाज स्टार झाला. 'बंदूकबाज' मधीलबाबू मोशायची भूमिका असो किंवा 'सेक्रेड गेम्स'मधील गणेश गायतोंडे असो, नवाजने सगळ्या भूमिका साकारुन चाहत्यांची मने जिंकली आहेत