नवाजुद्दीनने आपल्या आत्मचरित्रात Love Lifeबद्दलचे सांगितले गुपीते...

  बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीमध्ये आपल्या आयुष्यासंबंधी अनेक गुपीते उघड केली आहेत. त्यात त्याने आपल्या लव  लाइफबद्दलही काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. 

Updated: Oct 24, 2017, 10:09 PM IST
 नवाजुद्दीनने आपल्या आत्मचरित्रात Love Lifeबद्दलचे सांगितले गुपीते...  title=

नवी दिल्ली :  बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीमध्ये आपल्या आयुष्यासंबंधी अनेक गुपीते उघड केली आहेत. त्यात त्याने आपल्या लव  लाइफबद्दलही काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. 

त्याने आपल्या पुस्तकात खूप उघडपणे आपल्या प्रेसयींच्या शरीराप्रती होणाऱ्या आकर्षणाबद्दल बोलले आहे. नवाजने आपल्या पुस्तकात लिहिले की कशी सर्वात प्रथम त्याच्या आयुष्यात सुनीता आली. त्यानंतर त्याचे न्यूजर्सीच्या सुजैनशी सूत जुळले. 

मिस लवलीच्या को-स्टावर जीव जडला

त्यानंतर त्याच्या प्रेमाची गाडी इथेच थांबली नाही.  त्यानंतर 'मिस लवली'च्या शुटींगवेळी नवाजला आपली को-स्टार निहारिका सिंह हिच्यावर जीव जडला होता.  या चित्रपटाची शुटींग सुरू होती त्यावेळी मला वाटले की ती कोणत्यातरी गोष्टीने माझ्याशी नाराज आहे.  ती एकटी एकटी आणि नाराज राहायला लागली. मी तिला अनेकवेळा ही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तीने काहीच सांगितले नाही. मग मी एक दिवशी तिला घरी मटण खाण्यासाठी आमंत्रित केले. ही माझी खासियत आहे, मला खूप चांगले मटण करता येते. तीने मान्य केले. तीने मटण खाले आणि माझी प्रशंसाही केली. त्यानंतर तीने मला घरी आमंत्रीत केले आणि म्हटले नवाज माझ्या घरी ये, मी तुझ्यासाठी मटण तयार करेल. 

निहारिकाच्या घऱी गेलो आणि...

मी निहारिकाच्या घरी गेलो, दरवाजा उघडल्यावर मेणबत्त्या जळत होत्या. मी ठरलो गावठी... मी सरळ तिला आलिंगन मारले आणि तिला बेडरूमध्ये घेऊन घुसलो, त्यानंतर आम्ही खूप प्रेम केले. त्यानंतर निहारिका आणि माझे संबंध सुरू झाले, असा उल्लेख नवाजने केला आहे. असे नाते जे माझ्या कल्पनेच्या पलिकडे होते, ते दीडवर्ष चालले.

दरम्यान, हे सुरू असताना सुजैन मला मेल पाठवायची, या गोष्टीबद्दल निहारिकाला माहिती झाले आणि सुजैन आणि नवाजचे संबंध संपले. 

मी स्वार्थी होतो... मला हवे होते...

नवाज पुढे लिहतो, सर्व मुलींप्रमाणे निहारिकाचीही इच्छा होती की मी तिच्याशी गोड गोड गोष्टी कराव्यात. जशा एखादा प्रियकर करतो, पण मी स्वार्थी होतो. मी तिच्या घऱी एकाच कारणासाठी जायचो, ती होती निहारिका... केवळ गरज म्हणून मी तिच्याकडे जायचो. 

एकदा तिच्या घरी गेलो तरी तिने सिल्क रोब परिधान केला होता. मी तिच्या बगलेत हात टाकला, तेव्हा ती बोलली नाही नवाज आता मी तुला पुन्हा भेटणार नाही. तिच्या या गोष्टीने मी घाबरलो. मी रडायला लागलो. तिची विनवणी करायला लागलो. पण ती आपल्या निर्णयावर कायम होती. 

मला नाही माहिती की यानंतर माझ्या आयुष्यात कोणती मुलगी येईल की नाही, आम्ही लग्न करू ती माझी बायको बनेल, असेही म्हटले आहे.