Durgs Case : NCB चे प्रमुख दिल्लीला रवाना; मात्र कुणालाही क्लिन चीट नाही

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना

Updated: Sep 28, 2020, 10:55 AM IST
Durgs Case : NCB चे प्रमुख दिल्लीला रवाना; मात्र कुणालाही क्लिन चीट नाही

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचा संबंध ड्रग्स कनेक्शनशी असल्याच स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती आणि ही चौकशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना करत होते. पण आता अशी माहिती मिळाली की राकेश अस्थाना पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. अस्थाना रवाना झाले असले तरीही कुणालाही क्लीन चिट मिळालेली नाही. 

राकेश अस्थाना जाताना अधिकाऱ्यांना काही सूचना देऊन गेल्याचं कळत आहे.  ज्यात तपासाची दिशा काय असेल याचे निर्देश दिले ,कोणालाही क्लीन चिट दिली नाही, तपास सुरू आहे. पण तपास सुरू असताना राकेश अस्थाना दिल्लीला गेल्यामुळे सगळ्यांच लक्ष तिकडेच केंद्रीत झालं आहे. 

या प्रकरणाची चौकशी करायला स्वतः राकेश अस्थाना रविवारी मुंबईत आले होते. मात्र आज ते दिल्लीला पुन्हा रवाना झाले आहेत. रविवारी अस्थाना यांनी या संदर्भातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला. 

ड्रग्स चॅठ संदर्भात ज्या बॉलिवूड कलाकारांची नाव पुढे आलीत त्याची चौकशी केली. एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिकाची एक्स मॅनेजर करिश्मा प्रकाशची शनिवारी चौकशी केली. या क्रमातच एनसीबीने धर्मा प्रोडक्शनचे माजी अधिकारी क्षितीज प्रसादला देखील अटक केलं आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत क्षितीज अटकेत असणार आहेत.