कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची धाड

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई

Updated: Nov 21, 2020, 12:17 PM IST
कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची धाड

मुंबई : कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी छापा टाकला. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांवरही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे. ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने रेड टाकली आहे.

भारती सिंहच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात धाड टाकली.

Bharti Singh - Latest News on Bharti Singh | Read Breaking News on Zee News

भारती सिंह अनेक शोमध्ये काम करलिवत आहे. एक कॉमेडियन म्हणून तिने तिची ओळख निर्माण केली आहे.

एनसीबीच्या कारवाईत आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांचं नाव पुढे आलं आहे. एनसीबी बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शनवर सध्या तपास करत आहे.