Drugs Case : एनसीबी करण जोहरलाही पाठवू शकते समन्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.  

Updated: Sep 25, 2020, 05:34 PM IST
Drugs Case : एनसीबी करण जोहरलाही पाठवू शकते समन्स

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. सुशांत अत्महत्या प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, श्रद्धा कपूर आणि दिपिका पादुकोणनंतर आता एनसीबी दिग्दर्शक करण जोहरला देखील ड्रग्स प्रकरणी समन्स पाठवू शकते. गेल्या वर्षी करणच्या घरातील एका पार्टीचा व्हिडिओ सेशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच संबंधी एनसीबी करणची चौकशी करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. 

करण जोहरच्या ड्रग्स पार्टीवर NCBची नजर

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रकुल प्रीतच्या चौकशी दरम्यान २०१९मध्ये करणच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती मिळाली आहे. त्यानंतर केपीएस मल्होत्रा ​​चौकशीसाठी एनसीबी झोन ​​कार्यालयात पोहोचले. आता केपीएस मल्होत्रा ​​आणि समीर वानखेडे व्हिडिओवर रकुल प्रीत सिंह आणि धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितीज यांची चौकशी करत आहेत. 

३०  जुलै २०१९ मध्ये झालेल्या या पार्टीची चौकशी एनसीबी करत आहे. खुद्द करण जोहरने हा व्हिडिओ सोशल मीडीयावर पोस्ट केला. त्यानंतर या व्हिडिओवर टीका देखील करण्यात आली. या पार्टीमध्ये विक्की कौशल, दीपिका पादुकोण, झोया अख्तर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, रणबीर कपूर उपस्थित होते.