Neha Dhupia चा बेबी बम्पसह स्विमिंगपूलमध्ये हॉटलूक; पाहा फोटो

नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई...

Updated: Sep 18, 2021, 01:14 PM IST
Neha Dhupia चा बेबी बम्पसह स्विमिंगपूलमध्ये हॉटलूक; पाहा फोटो

मुंबई : अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) सध्या चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसचं आहे. नेहा लवकरचं तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. नेहा सध्या आयुष्यातील महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण व्यतीत करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर नेहाचे केही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नेहा बेबी बम्पसह स्विमिंगपूलमध्ये आनंद लुटताना दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा स्विमिंगसूट घातला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'दोघांसाठी पूलपार्टी....' असं लिहिलं आहे. फोटोंध्ये नेहा फार सुंदर दिसत आहे. दरम्यान नेहाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नेहा आणि पती अंगद बेदीच्या घरी लवकरचं नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नेहा दुसऱ्यांदा आई होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर फोटो शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये, 'आम्हाला कॅप्शन ठरविण्यासाठी 2 दिवस लागले... सर्वात जास्त चांगला विचार करू शकलो, तो म्हणजे देवा तुझे आभार...' असं लिहिलं आहे. नेहाच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पूर्ण बेदी कुटुंब दिसत आहे. 

नेहाने तिन वर्षांपूर्वी  अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं. 10 मे 2018 साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर नेहाने 18 नोव्हेंबर 2018 साली एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मेहर असं आहे.