लग्नाच्या वाढदिवशी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत झाले रोमँटिक, किस करत सेलिब्रेशन

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी एकमेकांना किस करत लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलंय.

Updated: Oct 25, 2022, 10:06 PM IST
लग्नाच्या वाढदिवशी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत झाले रोमँटिक, किस करत सेलिब्रेशन title=

मुंबई : जगभरात नेहा कक्करचे लाखो फॅन्स आहेत. नेहा कक्करच्या (Neha kakkar) लग्नाची बातमी आली तेव्हा अनेक चाहत्यांचा नक्कीच हार्टब्रेक झाला असेल. पण नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग (Neha kakkar and rohanpreet singh) यांच्या लग्नाला सोमवारी 2 वर्ष झाले आहे. दोघांनी लग्नाचा वाढदिवस आणि दिवाळी एकत्र साजरी केली. नेहाने तिचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दिवाळीच्या दिवशी नेहाने कुटुंबातील सदस्यांसोबतचे फोटो शेअर केले होते. या उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले आहेत. नेहा आणि रोहनप्रीतने मॅचिंग आउटफिट्स घातले आहेत. तिने एक डान्स व्हिडिओ देखील शेअर केला आणि तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहाने पांढऱ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. तिने त्यावर हिरवा दुपट्टा आणि हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. रोहनप्रीतने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता, पायजमा आणि हिरवी पगडी घातली आहे. नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कर, तिचे पालक नीती कक्कर आणि हृषीकेश कक्कर यांचा एक कौटुंबिक फोटो देखील शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कपल एकमेकांना किस करत आहे. नेहाने या व्हिडिओला कॅप्शन दिले की, आमच्या लग्नासाठी अभिनंदन. व्हिडिओमध्ये, नेहा रोहनप्रीतला 'लव्ह यू' म्हणते. दोघे एकत्र दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि शेवटी नेहा गाण्यावर नाचते.

एका चाहत्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, तुम्ही दोघे खूप क्यूट आहात. दुसरा म्हणाला, वाढदिवसाच्या शुभेच्छा, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. एका यूजरने लिहिले की, नेहमी एकत्र आनंदी रहा.

24 ऑक्टोबर 2020 रोजी नेहा आणि रोहनप्रीत विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस दिवाळीच्या दिवशीच आल्याने आनंद द्विगुणीत झाला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x