close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'ऐसा पती मुझे दो भगवान', नेहाला हवा स्वप्नातला राजकुमार....

तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं वर्णन करणारा हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल २४ लाख चाहत्यांनी पाहिला आहे

Updated: Jun 16, 2019, 10:16 AM IST
'ऐसा पती मुझे दो भगवान', नेहाला हवा स्वप्नातला राजकुमार....

मुंबई : प्रत्येक मुलीच्या मनात तिचा जीवनसाथी कसा असला पाहिजे याबद्दल अनेक अपेक्षा असतात. अशीच अपेक्षा गायिका नेहा कक्करने 'टिक टॉक' व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. आपल्या मधूर आवाजाने संपूर्ण जगाला घायाळ करणाऱ्या नेहाला संपूर्ण महिन्याचा पगार आपल्यावर खर्च करणारा पती हवा आहे. 
ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी नेहाचा 'ऐसा पती मुझे दो भगवान' हा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. नेहा नेहमीच 'टिक टॉक'वर नवनवीन व्हिडीओ पोस्ट करून आपल्या मनातल्या इच्छा चाहत्यांना सांगत असते. 

तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं वर्णन करणारा हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल २४ लाख चाहत्यांनी पाहिला आहे, तर ११ हजार चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट दिल्या आहेत. नेहा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर नेहाचे २० लाख फॉलोअर्स आहेत, तर 'टिक टॉक'वर ८ लाखांपेक्षा जास्त चाहते आहेत.

नेहा नेहमीच 'टिकटॉक'वर वेगवेगळे व्हि़डीओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. त्याचप्रमाणे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी नेहाचं अभिनेता हिमांश कोहलीसह ब्रेकअप झाले होते. त्यानंतर ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय नव्हती. आता नेहाची 'ऐसा पती मुझे दो भगवान' ही इच्छा कधी पूर्ण होईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.