Ranbir Kapoor Doppelganger Trolled: रणबीर कपूर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. मागच्या वर्षी रणबीरचे दोन चित्रपट (Ranbir Kapoor Films) प्रदर्शित झाले ते त्याच्या चाहत्यांना खूप जास्त आवडले. आता त्याचा 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचीही त्याच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आता रणबीर कपूरची सर्वत्र चर्चा आहे. त्यातून आलिया भट्टशी लग्न आणि राहा कपूरचा जन्म यांमुळे रणबीर हा विशेष चर्चेत आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रणबीर कपूर अजून एका कारणासाठीही चर्चेत आहे. नीरव भट्ट (Nirav Bhatt) हा सात वर्षांचा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. लहानपणी रणबीर कपूर जसा दिसायचा तसाच नीरवही दिसतो म्हणून त्याला 'छोटा रणबीर कपूर' म्हणूनही ओळखले जाते आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीरवनं सोशल मीडियावरून (Nirav Bhatt on Social Media) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यालाही जेव्हा त्याच्या आईवडिलांकडून कळलं की तो रणबीर कपूरसारखा दिसतो तेव्हा त्याला खूप आनंद झाला असल्याचे तो सांगतो. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या इन्टाग्राम पेजवरून त्याची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात तो म्हणतो की, ''मला आधी रणबीर कपूर हा कोण आहे हे माहितीच नव्हते. परंतु अनेकजण अगदी माझे नातेवाईकही मला सांगायचे की मी रणबीर कपूरसारखा दिसतो तेव्हा त्याची फार गंमत वाटायची की आपण कोणासारखं तरी दिसतोय. परंतु मला याची काहीच कल्पना नव्हती. मध्ये मग मला माझ्या आईनं रणबीर कपूरचे फोटो दाखवले आणि त्यावर मला विश्वासच बसला नाही.
पुढे मग मला सगळे विचारू लागले की तू मॉडेलिंग (Modelling) का करत नाही. मग यातूनच आलिया भट्ट यांच्या ब्रॅण्डसाठी मला फोटोशूट करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांच्या ब्रॅण्ड्ससाठी फोटोशूट केले. त्याचे फोटो मग आलिया भट्ट यांनी सोशल मीडियावर शेअर केले. तेव्हा लोकं मला ओळखू लागले आणि त्यावेळी मग माझी खरी ओळख लोकांनी कळू लागली.'', असं तो म्हणाला.
नीरव हा सध्या शाळेत शिकतो आहे त्यानं पियानोचे क्लासेसही सुरू केले आहेत. परंतु सध्या सर्वत्र नीरवचे कौतुक होत असलं तरी अनेकजण नीरवच्या आईवडिलांवर संतापले आहेत. नेटकऱ्यांनी ऐवढ्या लहान मुलाला तुम्ही रणबीर कपूर बनवू नका. त्याला तो जसा आहे तसंच ठेवा. तर काहींनी असं म्हटलं आहे की, त्याला लाईमलाईटमध्ये आणण्यापेक्षा त्याच्या शिक्षणाच्या दृष्टीनं प्रयत्न करा, असं कमेंट्स लोकं करू लागले आहेत.
सध्या या कमेंट्सवरून लहान वयातच मिळणाऱ्या प्रसिद्धीचा मुलांना होणारा तोटा यावर नेटकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.