टेलिव्हिजन अभिनेत्याला डेट करायची दिशा पटानी, ब्रेकअपचं कारण जाणून धक्काच बसेल

सध्या दिशा पटानी अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत आहे. 

Updated: May 16, 2019, 01:43 PM IST
टेलिव्हिजन अभिनेत्याला डेट करायची दिशा पटानी, ब्रेकअपचं कारण जाणून धक्काच बसेल

मुंबई :  कलाविश्वातील बहुचर्चित जोड्यांच्या यादीत अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ही जोडी अनेकदा प्रकाशझोतात येते. सध्याही ही जोडी चर्चेचा विषय ठरत आहे. पण, त्यांच्या कोणा एका पोस्टमुळे नव्हे, तर दिशाच्या खासगी आयुष्यामुळे. 

टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी दिशा ही एका टेलिव्हिजन अभिनेत्याला डेट करत होती. 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेता पार्थ समथान याला ती डेट करत होती. सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार पार्थ आणि दिशा जवळपास वर्षभरासाठी रिलेशशिपमध्ये होते. ज्यानंतर खुद्द दिशानेच या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण होता बिग बॉस स्पर्धक विकास गुप्ता. 

लाफिंग कलर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'पार्थ हा बायसेक्शुअल bisexual होता. दिशासोबतच असतेवेळीच पार्थ विकासच्याही संपर्कात होता. दिशाला त्या दोघांची काही छायाचित्रही सापडली होती, ज्यामुळे तिने पार्थसोबतच्या नात्यात इथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. दिशा आणि पार्थच्या नात्यापेक्षा सध्या अनेकांनाच धक्का बसत आहे तो म्हणजे त्यांचं ब्रेकअप होण्यामागच्या मुख्य कारणाचा. 

दरम्यान, पार्थसोबतच्या नात्यातून वेगळं होत दिशाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण कणारी दिशा सध्या विविध ठिकाणी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत पोहोचत आहे. या दोघांकडून अद्यापही त्यांच्या नात्याविषयी अधिकृत  माहिती देण्यात आलेली नाही. पण, तरीही त्यांच्या नात्याविषयी चर्चा झाल्यावाचून राहत नाहीत हेच खरं.