व्हिडिओ : निया शर्माचा बोल्ड अंदाज

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा अनेक टीव्ही शोज मधून आपल्या भेटीला आली आहे.

Updated: Jul 21, 2018, 08:40 AM IST
व्हिडिओ : निया शर्माचा बोल्ड अंदाज

मुंबई : बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा अनेक टीव्ही शोज मधून आपल्या भेटीला आली आहे. त्यानंतर अनेक वेब सिरीजमध्येही ती झळकली. आपल्या खास स्टाईल आणि बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारी निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

निया शर्माने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ नियाने केलेल्या फोटोशूटचा आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर एका दिवसात त्याला ३.५ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले. यात निया हॉट लूकमध्ये दिसतेय. 

तुम्हीही पहा हा खास व्हिडिओ...

 

 @shaahidamir @cashmakeupartistry @faisal_2328 

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

टीव्ही वरील सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून निया शर्मा लोकप्रिय आहे. निया शर्माने काली या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर केलेल्या ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही तिचे अनेक धोकादायक स्टंट पाहायला मिळाले. निया शर्मा तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया चांगलीच अॅक्टीव्ह असून तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. गेल्यावर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.