प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या वाईट काळाचा सामना करत आहेत.

Updated: Dec 7, 2021, 04:44 PM IST
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या वाईट काळाचा सामना करत आहेत. निक जोनास आणि प्रियांका चोप्राचा जवळचा मित्र थॉम शेरे याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनाने प्रियांका आणि निक दोघही  तुटले आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या  भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पती निक जोनासने शेअर केलेली पोस्ट रिपोस्ट केली आहे आणि थॉमच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पती निक जोनासची पोस्ट रिपोस्ट शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिलंय की, 'खूप लवकर निघून गेलास, थॉम शेर... तुझी आठवण कायम येईल.  तुझ्या कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींसाठी प्रार्थना. त्याचबरोबर निक जोनासने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये थॉमसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. तिने एक जुना फोटो शेअर करून आपल्या मित्राच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. थॉमच्या अनपेक्षित निधनाने दुःखी असल्याचं निकने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये निकनं लिहिलंय की,  थॉम शेर द बियॉन्ड टाइप 1 चे प्रेसिडेंट आणि सीईओ  यांच्या अनपेक्षित निधनाने खूप दुःख झालंय. थॉमला जवळपास 7 वर्षांपासून ओळखण्याचं मला भाग्य लाभलं. आम्ही केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे. टाइप 1 डायबिटीज असलेल्या लोकांसाठी वकील. ते सर्वांचे उत्तम सहकारी, सल्लागार आणि मित्र होता. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या वर्षी फेब्रुवारीमध्ये थॉमने प्रियांकाचं बियॉन्ड टाइप 1 च्या निदेशक मंडळात स्वागत केलं. तिने त्यावेळी तिच्या इंस्टाग्रामवर लिहिलं, "जगभरातील मधुमेह असलेल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मी प्रियांका, निक आणि संपूर्ण बियॉन्ड टाईप 1 मंडळ टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे."