बॉलिवूडकरांसोबत रमला निक जोनास

प्रियांकाही त्याला साथ देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी हजर होती. 

Updated: Oct 1, 2018, 07:28 PM IST
बॉलिवूडकरांसोबत रमला निक जोनास title=

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये परतली असून, सध्या ती 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. प्रियांका भारतात तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करत असतानाच तिचा प्रियकर निक जोनासही भारतात आला आहे. 

भारतात आल्यानंतर निकने प्रियांकासोबत काही क्षण व्यतीत केले. ज्यानंतर त्याने बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर मंडळींसोबतही कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. 

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये निकची ही धमाल पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये निक 'धडक' फेम अभिनेता इशान खट्टर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधान महेंद्रसिंह धोनी, अभिनेता आदित्य रॉय़ कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. 

निक मैदानात खेळाचा आनंद घेत असतानाच प्रियांकाही त्याला साथ देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी हजर होती. 

 
 
 
 

Bae in Bombae!!  #friends #mumbai #football @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

'ऑल स्टार्स फुटबॉल क्लब' म्हणजेच 'एसएसएफसी'शी अनेक प्रसिद्ध चेहरे जोडले गेले असून, ते दर रविवारी येथे येऊन फुटबॉलचा आनंद घेतात. या साऱ्यामध्ये निकच्या रुपात यावेळी एका परदेशी पाहुण्याचीही उपस्थिती पाहायला मिळाली असंच म्हणावं लागेल. 

सेलिब्रिटींची हजेरी असणाऱ्या या क्लबमध्ये येणारे पैसे हे गरजुंच्या मदतीसाठी वापरण्यात येतात.