प्रियांका चोप्राचा पती बाळाला कसा झोपवतो? व्हिडिओ पाहून सगळेच निकच्या प्रेमात

 निक ज्या पद्धतीने बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे, ते पाहून अनेक जण त्याच्या प्रेमात पडली आहे. 

Updated: Feb 14, 2022, 12:50 PM IST
  प्रियांका चोप्राचा पती बाळाला कसा झोपवतो? व्हिडिओ पाहून सगळेच निकच्या प्रेमात  title=

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आई होण्याचा आनंद लुटत आहे. खुद्द प्रियांकाने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली होती.

प्रियांका आणि निक जोनास सरोगसीद्वारे पालक झाले आहेत. 2018 मध्येच दोघांचे लग्न झाले. पण सरोगसी तंत्राच्या मदतीने  प्रियांका आई झाली आहे. 

प्रियंकाने स्वतः दिली चाहत्यांना खुशखबर  

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही सरोगसीद्वारे मुलाचे स्वागत केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला या विशेष काळात गोपनीयता ठेवण्याची आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. 

निक जोनास यानेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या खास प्रसंगी प्रियंका आणि निक जोनास यांचे बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी अभिनंदन केले. त्यानंतर आता निकचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

निकच्या हातात बाळ आहे , आणि तो या बाळाला झोपवताना दिसत आहे. निक ज्या पद्धतीने बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे, ते पाहून अनेक जण त्याच्या प्रेमात पडली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण हा व्हिडिओ आताचा नसून जुना असल्याचं बोललं जात आहे. निकच्या घरी बाळाचं आगमन होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. निक एक बाबा म्हणून कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूरेसा असल्याचं म्हटलं जात आहे.